Shivsena : शिवसेनेचा मोठा नेता एकनाथ शिंदेंवर नाराज का? जाहीरातीतून धनुष्यबाण चिन्ह गायब

Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा ओघ वाढत आहे. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सोप्या नसतील. काही गोष्टींवरुन ते दिसू लागलय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना आमदाराने जाहिरात दिली आहे. त्यावरुन काही गोष्टी दिसू लागल्या आहेत.

Shivsena : शिवसेनेचा मोठा नेता एकनाथ शिंदेंवर नाराज का? जाहीरातीतून धनुष्यबाण चिन्ह गायब
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jan 23, 2025 | 9:52 AM

आज दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. दोन गट झाले. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा अंधेरीत तर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसीवर होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बदलेली राजकीय स्थिती पाहता उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. राज्यभरातील ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणवुकीचे निकाल जाहीर झाले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे फक्त 20 आमदार निवडून आले. त्यानंतर भविष्यातील शिवसेनेची दिशा काय असेल ते स्पष्ट झालं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ओघ वाढला. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सोप्या नसतील. काही गोष्टींवरुन ते दिसू लागलय. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी जाहिरात दिली आहे. त्यावरुन धाराशिव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदेंचा फोटो लहान

जाहिरातीमध्ये धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह गायब असून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान आहे. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान लावल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी अनेक दैनिकात अभिवादनाच्या जाहिरती दिल्या आहेत.

म्हणून नाराजी का?

तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. त्यांच्या काही वक्तव्यांवरुन वादही निर्माण झाला होता. आता देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रीपद मिळवण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला. पण यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.