महाविकास आघाडी एकत्र न राहिल्यास भाजपला रोखणं कठीण : अमोल मिटकरी

अमोल मिटकरी म्हणाले, "महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे".

महाविकास आघाडी एकत्र न राहिल्यास भाजपला रोखणं कठीण : अमोल मिटकरी
Amol Mitkari
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 2:29 PM

मुंबई : जर यापुढे महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर येत्या निवडणुकांमध्ये भाजपला रोखणं कठीण होईल, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. अकोल्यात त्यांच्या सर्कलमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने मिटकरींना धक्का दिला. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजप १, शिवसेना १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १ आणि इतर ९ (यामध्ये प्रहार १) जागा मिळाल्या.

याबाबत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे”.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

महाविकास आघाडीची बेरीज भाजपपेक्षा सरस आहे. मात्र इथून पुढे सर्वांनी विशेषता महाविकास आघाडीने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. स्वबळावर लढलो तर भाजपला यश मिळत राहील, महाविकास आघाडीने आत्मचिंतन करणं गरजेचं, सर्वांनी एकत्र येऊन भाजपला रोखलं पाहिजे, स्वतंत्र गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक आहे.

महाविकास आघाडी जर एकत्र आली नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण यश मिळवू शकणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

प्रहार या पक्षाला कुटासा या माझ्या गावात बच्चू भाऊंच्या पक्षाला फक्त ७८ मतं आहेत, आमच्या उमेदवाराला ९५३ मतं आहेत. याचा अर्थ असा आहे, कामं केलं नसती तर मतं मिळाली नसती. पण दुर्दैवाने आमचा पराभव झाला. भाजपची मतं प्रहारने खेचली. अकोल्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची कामगिरी चांगली आहे. माझ्या सर्कलमध्ये पराभव झाला असला तरी ग्रामीण भागात फार मोठं यश मिळालं.

बच्चू कडूंनी भाजपसोबत छुपी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसला. त्याची दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.

आगामी काळात महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र राहणं या मतावर मी ठाम आहे, असं मिटकरींनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

Amol Mitkari vs Bachhu Kadu : चुलीत गेलं मंत्रिपद, उद्या राजीनामा फेकतो, बच्चू कडू अमोल मिटकरींवर कडाडले

Akola Election Result : अमोल मिटकरींचा गावातच पराभव, बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ची धडाकेबाज एण्ट्री

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.