राष्ट्रवादीचा एक्का, सूनबाईंना धक्का, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसेंचा उमेदवारी अर्ज बाद

मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. या ठिकाणी रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची चिन्हं आहेत. रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा एक्का, सूनबाईंना धक्का, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसेंचा उमेदवारी अर्ज बाद
EKNATH KHADSE RAKSHA KHADSE
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 7:47 AM

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse), विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ (Smita Wagh) यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे बिनविरोध निवडून येणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे.

रक्षा खडसे-स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद

धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत.

एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता.

खडसे बापलेकीचा अर्ज कायम

मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. या ठिकाणी रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची चिन्हं आहेत. रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचाही अर्ज बाद झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारीची संधी मिळणार आहे. संतोष चौधरी यांना पक्षांतर्गत कुरघोडींचा फटका बसल्याचं दिसत आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते. मात्र काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला. बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता.  काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका मांडली होती.

संबंधित बातम्या :

जळगावमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे, ‘भाजपच्या एकला चलो’नंतर जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका! माजी खासदार, आमदाराची काँग्रेसमध्ये घरवापसी!

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.