खडसेंनी राजीनामा दिला, शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार; जयंत पाटलांची अधिकृत घोषणा

शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.  (Jayant Patil Official declared Eknath khadse join NCP)

खडसेंनी राजीनामा दिला, शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार; जयंत पाटलांची अधिकृत घोषणा
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 2:18 PM

मुंबई : “गेली साडेतीन दशकं भाजपला वाढवणारे आणि भाजपला बळ वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे,” अशी मोठी आणि अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी केली. (Jayant Patil Official declared Eknath khadse join NCP)

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचं स्वागत, सध्या प्रवेशाची बातमी, त्यांना कोणतं पद मिळणार हे योग्य वेळी समजेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपमध्ये एकनाथ खडसेंवर होणारा त्रास सर्वांनी पाहिला आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग केला, आणखी कोण येणार, याचा उलगडा हळूहळू होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसेंसोबत येण्याची अनेक जणांची इच्छा आहे. मात्र कोरोना काळात विधानसभा निवडणूक घेणे शक्य नाही, त्यामुळे हळूहळू सर्वांचे प्रवेश होतील, अनेक जण त्यांच्या संपर्कात आहेत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

एकनाथ खडसेंना आम्ही प्रवेश दिला आहे, भाजपकडून हिरमोड झालेले आणि भाजपकडून विकासाची अपेक्षा न उरलेले एकनाथ खडसेंसोबत येतील.  विविध भागातील तीन ते चार भाजप नेत्यांशी चर्चा सुरु आहे. त्यांचीही राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, दिवसाढवळ्याच होईल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.  (Jayant Patil Official declared Eknath khadse join NCP)

संबंधित बातम्या :

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

कन्येसह राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच राहणार; नाथाभाऊंची नवी ‘खेळी’

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.