‘शरद पवारांना 2024 ला सर्वात मोठी भेट द्यायची आहे’, मावळमध्ये जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश; ती भेट नेमकी कोणती?

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या समस्या, पक्षाकडून काही अपेक्षा असतील त्या समजून घेण्यासाठी सुरु करण्यात आलीय. ही यात्रा सुरु झाल्यापासून आम्हाला प्रत्येक तालुक्यातील शरद पवारांची ताकद समजली. आता 2024 ला शरद पवार यांनी मोठी भेट द्यायची आहे, असा आदेशच जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.

'शरद पवारांना 2024 ला सर्वात मोठी भेट द्यायची आहे', मावळमध्ये जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश; ती भेट नेमकी कोणती?
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 12:17 AM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आज मावळमध्ये पोहोचली. त्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या समस्या, पक्षाकडून काही अपेक्षा असतील त्या समजून घेण्यासाठी सुरु करण्यात आलीय. ही यात्रा सुरु झाल्यापासून आम्हाला प्रत्येक तालुक्यातील शरद पवारांची (Sharad Pawar) ताकद समजली. आता 2024 ला शरद पवार यांनी मोठी भेट द्यायची आहे, असा आदेशच जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या पक्षात काम करत आहोत. एकदा आम्ही महाराष्ट्रात 72 आमदारांच्या संख्येवर पोहोचलो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाकडे आली. एकत्रित काम करायचं म्हणून आम्ही ती संधी सोडली. महाराष्ट्रात 2024 ला निवडणुकांमध्ये सर्व जागा निवडून आणण्याची जिद्द तुमच्यात हवी. शरद पवार यांनी उभं आयुष्य वेचलं. आजही ते 24 तास काम करतात. त्या शरद पवार साहेबांना 2024 साली सर्वात मोठी भेट द्यायची आहे. 2024 ला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष करायचा आहे, राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आणायचे आहेत आणि ते काम तुम्ही आम्ही करायचं आहे.

‘दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळात आम्हाला झुकायचं नाही ही शिकवण दिली. महाराष्ट्राला कायम दिल्लीश्वरांनी कमी पाहिलं. पण महाराष्ट्र कधीही झुकला नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. कोण फुटत नाही म्हणून मंत्र्यांवर धाडी सुरु केल्या आहेत. कुणी तरी आरोप केले, पुरावा नसताना अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली. जाणूनबुजून सीबीआय, ईडी कारवाई करते. नवाब मलिक यांची काय चूक आहे. NIA लाही मध्ये आणायचा प्रयत्न केला, दाऊद, दहशतवाद असा गाजावाजा करणार आणि मंत्र्यांना बदमान करण्याचं काम सुरु आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केलीय.

इतर बातम्या : 

SambhajiRaje Hunger Strike : खासदार संभाजीराजे छत्रपतींचा उपोषणस्थळी मुक्काम; कार्यकर्त्यांची साथ, सत्ताधाऱ्यांची पाठ!

Russia Ukraine War : यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचं पहिलं विमान मुंबईत दाखल, विमानतळावर भावूक स्वागत

Non Stop LIVE Update
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.