दोन तडफदार तरुण, ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो; वळसे पाटलांनी पदभार स्वीकारताच आठवणी ताज्या, जुना फोटो शेअर करत जयंत पाटील म्हणाले…

दोन तडफदार तरुण, ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो; वळसे पाटलांनी पदभार स्वीकारताच आठवणी ताज्या, जुना फोटो शेअर करत जयंत पाटील म्हणाले...
दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलीप वळसे पाटलांसोबतचा त्यांचा ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. (jayant patil dilip walse patil photo)

prajwal dhage

|

Apr 06, 2021 | 4:50 PM

मुंबई : राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या काही नेत्यांकडे पाहून आपल्याला त्यांचा कधीकधी हेवा वाटतो. त्यांचा थाटमाट, त्यांच्यात असलेली समाजाभीमूखता आपल्याला हवीहवीशी वाटते. मात्र, याच नेत्यांचा त्यांच्या तरुणपणीचा संघर्ष अनेकांना माहिती नसतो. या नेत्यांनी त्यांच्या तरुणपणी केलेल्या संघर्षाची जाणीव आपल्याला नसते. सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गृहमंत्रिपदाचा पदभार राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Pati) यांनी नुकताच स्वीकारला आहे. याचेच औचित्य साधून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी (Jayant Patil) तरुणपणीच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांसोबतचा त्यांचा ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. . (Jayant Patil shared old black and white photo and congrats Dilip Walse Patil)

‘कडक शिस्तीचे प्रशासक’

दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन केले जात आहे. जयंत पाटील यांनीसुद्धा आपला जुना काळ आठवत वळसे पाटील यांचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले आहे. त्यांनी वळसे पाटील यांना कडक शिस्तीचा प्रशासक म्हटलं आहे. “माझे जुने मित्र दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता गृहमंत्रिपदाच्या जबाबदारीसाठीही मनापासून शुभेच्छा,” असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांचे ट्विट

  दिलीप वळसे पाटलांनी पदभार स्वीकारला

दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. परंतु, गृहमंत्रिपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन. तसेच प्रशासकीय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. (dilip walse patil taken charge as a home minister)

पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले. मी आजच पदभार स्वीकारला आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचं काम मी करेल. सध्याचा काळ अवघड आणि चॅलेंजिंग आहे. कोरोनामुळे पोलीस फोर्स रस्त्यावर आहेत. फिल्डवर काम करत आहे. पोलीस दलाचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आहे. तरीही कोरोनामुळे त्यांना ही ड्युटी करावी लागत आहे. त्यातच आता एप्रिलमध्ये गुडीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजानची सुरुवात आदी विविध सण-उत्सव आहेत. प्रत्येक धर्मियांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

सध्याचा काळ चॅलेंजिंग, प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट घेतील; संजय राऊत सोयीनुसार बोलतात: प्रसाद लाड

शरद पवारसाहेब नजीब मुल्लाला आवरा, खुनाला उत्तर खुनाने योग्य नाही; राज ठाकरे गरजले

(Jayant Patil shared old black and white photo and congrats Dilip Walse Patil)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें