फडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा : जयंत पाटील

विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असं जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil on Devendra Fadnavis) म्हणाले.

फडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा : जयंत पाटील
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 1:04 PM

 कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असं जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil on Devendra Fadnavis) म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते किंवा माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, असं भाकीत संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. (Jayant Patil on Devendra Fadnavis)

मला आनंद वाटत आहे देवेंद्र फडवणीस केंद्रात जाणार आहेत. भय्याजी जोशी यांच्या बोलण्याचा हाच अर्थ होतो. देवेंद्र  फडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असं जयंत पाटील म्हणाले.

आमचं सरकार व्यवस्थित चालू आहे. कोणतीही धुसफूस नाही, आम्ही  मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे  यांच्या  नेत्तृवात  काम  करत आहे. सीएए, एनआरसी याबाबत मी बोलणं योग्य ठरणार नाही. उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. आम्ही याबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सीएए आणि एनआरसी वरुन मुख्यमंत्री ठाकरे यांची भूमिका मवाळ झाली आहे का? या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.

ब्राह्मण अधिवेशनाला जयंत पाटील यांची उपस्थिती

दरम्यान, आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्यावतीने कोल्हापुरात दोन दिवसीय ब्राह्मण अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाला सुरुवात झाली. शहरातील दसरा चौका मैदानात हे अधिवेशन भरवण्यात आलं आहे. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार असून, परिषदेच्या वेबसाईटचे उद्घाटनदेखील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान आज सकाळी शोभा यात्रेने या आधिवेशनाला प्रारंभ झाला.

“प्रत्येक समाज आपल्या समाजातील शेवटच्या माणसाच्या सुखासाठी प्रयत्न करतो असतो. प्रत्येक समाजात कमकुवत घटक आहेत. अलिकडे दुसऱ्या जातीला शिव्या दिल्या की आपल्या जातीचा नेता होतो अशी काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. आपण जाती आणि धर्म व्यवस्थेत अधिकच अडकलो आहोत. या देशातील आर्थिक परिस्थितीकडे कुणाचं लक्ष नाही. सगळे CAA आणि NRC वर चर्चा करत आहेत. समस्येकडे दुर्लक्ष व्हावं असा प्रयत्न अलिकडे सुरु आहे, असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.

Non Stop LIVE Update
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.