फडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थिल्लरपणा शोभत नाही अशी जहरी टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

फडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थिल्लरपणा शोभत नाही अशी जहरी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोणताही मुद्दा राहिला नाही, म्हणून मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी असं विधान केलं. असे शब्द वापरणे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला, असं जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. (Jayant Patils reply to Devendra Fadnavis on his comment on CM Uddhav Thackeray)

देवेंद्र फडणवीस यांचा आवज दाबण्यासाठी जलयुक्त शिवार चौकशी असं कोणी सांगितलं? कॅगने काही तपास केला. फडणवीस यांनी भ्रष्टाचार केला असं कोणीही म्हटलं नाही. त्यांनी अंगाला लावून घेऊ नये, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. भाजपने चिंता करु नये, त्यांनी काही केलं नाही तर घाबरु नये. कॅग रिपोर्ट आला म्हणून चौकशी असं त्यांनी नमूद केलं.

केंद्राकडे 28 हजार कोटी थकीत

केंद्राकडून अपेक्षा करण्याचे दोन मुद्दे आहेत. नैसर्गिक आपत्ती अली की केंद्राने मदत करणे अभिप्रेत आहे. शिवाय देशातील सर्व राज्यात आर्थिक स्थिती खराब आहे. 28 हजार कोटी जीएसटी देणं आहे. केंद्राकडूण अपेक्षा सगळे राज्य करतात,केंद्राने आमचे पैसे दिले नाही म्हणून अपेक्षा करतो. जितका महसूल जमा होतो तो सगळा पगारावर जातो. म्हणून आमचा आग्रह आमच्या हक्काचे पैसे केंद्राने लवकर द्यावे, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

पंचनाम्याशिवाय मदत हा भाजपचा दावा खोटा

भाजप सरकार असताना पंचनामे केल्याशिवाय कुणाला मदत केली नाही. अगदी घरं पडल्यावरदेखील पंचनाम्याशिवाय मदत झाली नाही. जे नुकसान झालं त्याची पाहणी केली पाहिजे, म्हणून पंचनामे करत आहोत. पंचनामे न करता कधीही मदत दिली नाही. अशी मदत दिली असा कोणाचा दावा असेल तर तो खोटा आहे. पडताळणी करून नेहमी तातडीची मदत देण्यात आली. कोल्हापूर- सांगलीत पूर आला तेव्हा सरकारच उशिरा आलं. लोकांनी स्वतःच्या ताकदीवर एकमेकांना मदत केली. नंतर शेवटच्या दोन तीन दिवसात लोकांना मदत मिळाली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

सरकार सक्षम

सरकार सक्षमपणे काम करतं. नाकर्तेपणाचा प्रश्न नाही. राज्यात जिथे संकट आले तिथे सरकारने कोरोना कळत काम केलं. पवारसाहेब फडणवीस सरकार असतानाही ते धावून जात होते. ते नेहमीच जातात, असं जयंत पाटील म्हणाले.

लोकल ट्रेन

मुंबईतील लोकल ट्रेनबाबत जयंत पाटील म्हणाले, “जेवढी वाहतूक वाढेल त्याच्या 10-15 दिवसात कोरोना रुग्ण संख्याही वाढेल. राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने प्रश्न सोडवले. महिलांसाठी लोकलची सोय करावी ही राज्य सरकारची भूमिका आहे. रेल्वेने विनाकारण वेळ लावू नये, त्यांनी लवकर ट्रेन प्रवास करु द्यावा”

(Jayant Patils reply to Devendra Fadnavis on his comment on CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या 

थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *