थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा

केंद्राने कुठलेही पैसे अडवलेले नाहीत, तुमचाच जीएसटी कमी आला. तो केंद्र सरकार स्वतः कर्ज काढून भरुन देत आहे" असा दावाही फडणवीसांनी केला.

थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा

माढा : थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, पहिल्यांदा त्यांनी काय मदत करणार हे सांगितलं पाहिजे. कोणती मदत करायचा तुमच्यात दम नाही का? असा घणाघात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्र सरकारकडे मदत मागितल्यास बिघडतं कुठे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यात विचारल्यानंतर फडणवीसांचा संताप पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट लडाखला जातात, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये, असंही फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं. (Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray in Solapur Rain affected Farmer Visit)

“नुकसानग्रस्तांना काय मदत करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित आहे. परंतु अशा प्रकारची थिल्लरबाजी, थिल्लरबाजीशिवाय मी दुसरं काही म्हणणार नाही. अशा प्रकारची थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माहित नसेल, मोदीजी तर थेट लडाखला जातात, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये. आज ते (मुख्यमंत्री) थोडक्याकरता बाहेर पडलेत, दोन तीन तासांचा प्रवास केलाय, मोठी गोष्ट आहे. गावकऱ्यांनी काय रिस्पॉन्स दिला त्यांनी पाहिलेलं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

“मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा काय मदत करणार हे सांगितलं पाहिजे. मोदीजी मदत करतीलच, ते करतच आले आहेत. मोदींनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि सांगितलं आम्ही तुम्हाला काय हवी ती मदत देऊ. इतक्या गंभीर दौऱ्यात असं थिल्लर वक्तव्य करणं शोभत नाही. केंद्राने कुठलेही पैसे अडवलेले नाहीत, तुमचाच जीएसटी कमी आला. तो केंद्र सरकार स्वतः कर्ज काढून भरुन देत आहे” असा दावाही फडणवीसांनी केला.

“फक्त टोलवाटोलवी करायची.. काही आलं की केंद्रावर फेका, इथे फेका तिथे फेका. तुमच्यात दम नाही का कोणती मदत करायचा? आम्ही मागच्या वेळी दहा हजार कोटींची मदत केली. सांगितलं, केंद्राची मदत येईल तेव्हा येईल. हिमतीने काम करावं लागतं. यांना मदतच करायची नाहीये, म्हणून केंद्राकडे बोट, याच्याकडे बोट. एक लाख 20 हजार रुपयांचं कर्ज काढण्याची क्षमता तुम्हाला दिली आहे, का नाही काढत? मला फायनान्स समजतो, त्यांनी लोकांची दिशाभूल करु नये. महाराष्ट्राने फक्त 50 हजार कोटींचं कर्ज काढलंय. अजून 70 हजार कोटींचं कर्ज काढण्याची क्षमता बाकी आहे. मदत काय करणार ते सांगा, कारणं देऊ नका” असा जाब देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला.

पाहा व्हिडीओ :

(Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray in Solapur Rain affected Farmer Visit)

संबंधित बातम्या :

बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा : उद्धव ठाकरे

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

(Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray in Solapur Rain affected Farmer Visit)

Published On - 5:44 pm, Mon, 19 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI