AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut ED Raid : रात्रभर ईडीच्या कार्यालयात, तरीही संजय राऊत तणावमुक्त; म्हणाले, झुकणार नाही

Sanjay Raut ED Raid : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर काल छापा मारण्यात आल्यानंतर राऊत यांच्या चेहऱ्यावर तणाव होता. ते चिंतातूर दिसत होते. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत जाताना राऊत यांनी काही झालंच नाही अशा पद्धतीने हातवारे करत ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत गेले होते.

Sanjay Raut ED Raid : रात्रभर ईडीच्या कार्यालयात, तरीही संजय राऊत तणावमुक्त; म्हणाले, झुकणार नाही
झुकेगा नही! रात्रभर ईडीच्या कार्यालयात, तरीही संजय राऊत तणावमुक्त; म्हणाले, झुकणार नाही Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 01, 2022 | 1:08 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांची काल ईडीने (ED)  तब्बल 16 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. राऊत रात्रभर ईडीच्या कार्यालयात होते. आज दुपारी साडे बारा वाजता त्यांना ईडीचे अधिकारी मेडिकल चेकअपसाठी जेजे रुग्णालयात घेऊन निघाले होते. राऊत यांना ईडीच्या कार्यालयातून बाहेर आणताच राऊतांनी दोन्ही हात उंचावून लोकांना अभिवादन केलं. मीडियाकडे पाहून हाताचा अंगठाही दाखवला. आपण ठिक ठिक आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, असंच राऊत दाखवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता किंवा तणाव नव्हता. उलट राऊत फ्रेश वाटत होते. आपल्या खास स्टाईलने ते मीडियाकडे पाहत हातवारेही करताना दिसत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात (maharashtra) काय चाललंय हे तुम्हाला माहीतच आहे. पण आम्ही झुकणार नाही, असं राऊत म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर काल छापा मारण्यात आल्यानंतर राऊत यांच्या चेहऱ्यावर तणाव होता. ते चिंतातूर दिसत होते. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत जाताना राऊत यांनी काही झालंच नाही अशा पद्धतीने हातवारे करत ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत गेले होते. त्यानंतर त्यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आणि रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी अटक करण्यात आली. त्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचे संकेत मिळत होते. कालची रात्र राऊत यांना ईडीच्या कार्यालात राहावे लागले. आज दुपारी ईडीचे अधिकारी त्यांना जेजे रुग्णालयात घेऊन गेले.

ना तणाव, ना चिंता

राऊत ईडीच्या कार्यालयाबाहेर पडल्यानंतर दोन्ही हात उंचावून त्यांनी लोकांना अभिवादन केलं. त्यानंतर पुन्हा एक हात उंचावला. त्यांच्या गळ्यात भगवा गमछा होता. त्यानंतर ते ईडीच्या गाडीत बसले. गाडीत बसल्यानंतरही ते हातवारे करत होते. मीडियाकडे बघून हात उंचावत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तसूभरही तणाव नव्हता. चिंता नव्हती. किंवा अपराधीपणाची भावनाही नव्हती.

झुकेगा नही

ईडीची धाड पडल्यानंतर अटक होणार असल्याची राऊत यांना कुणकुण लागली होती. यावेळी त्यांनी झुकणार नाही, असं ट्विट केलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी काहीच चुकीचं केलं नाही, असं ते म्हणाले होते. आजही जेजे रुग्णालयात आणल्यावर त्यांनी महाराष्ट्रात काय चाललंय हे आपण पाहतच आहात. पण आम्ही झुकणार नाही, असं राऊत म्हणाले.

कोर्टात हजर करणार

दरम्यान, मेडिकल चेकअपनंतर संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. कोर्टात हजर केल्यानंतर कोर्ट त्यांना कोठडी देते की जामीन हे पाहावं लागणार आहे.

Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा