AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सल्ला देणं भोवलं?, रोहित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांची पहिल्यांदाच टीका; काय म्हणाले?

अन्नपुरानी नावाचा तमिळ सिनेमा आलाय. दक्षिणेतील दोन सुपरस्टार त्यात काम करत आहेत. त्यात त्यांनी वाल्मिकी रामायणातील एक श्लोक म्हणून दाखवला. त्याचा अर्थ समजून सांगितला. तो पाहायचा असेल तर पाहा. मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलं नाही. पण आज अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सल्ला देणं भोवलं?, रोहित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांची पहिल्यांदाच टीका; काय म्हणाले?
jitendra awhad and rohit pawarImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 04, 2024 | 1:51 PM
Share

शिर्डी | 4 जानेवारी 2023 : देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये. नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेऊ नये, अशा शब्दात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार यांच्या या टीकेचा जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. मी रोहित पवार यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा हल्लाच जितेंद्र आव्हाड यांनी चढवला आहे. आव्हाड यांनी पहिल्यांदाच थेट रोहित पवार यांच्यावर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राम हा मांसाहारी होता, असं विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. आव्हाड यांच्या या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. भाजपने आव्हाड यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन होत आहे. आव्हाड यांच्या विधानाने राजकारण तापल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच आपलं विधान हे ओघातून झालं आहे, असं सांगतानाच आव्हाड यांनी वाल्मिकी रामायण आणि इतर पुस्तकांचा संदर्भ देत त्या पुस्तकात आपण जे म्हटलंय तेच म्हटल्याचाही दावा केला आहे.

ते अजून लहान आहेत

रोहित पवार यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता आव्हाड यांनी रोहित पवार यांनाच फटकारलं आहे. रोहित पवार काय बोलतात त्याला मी फार महत्त्व देत नाहीत. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही. ते अजून लहान आहेत. पहिली टर्म आहे त्यांची, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांना फटकारलं आहे.

आव्हाडांकडून पुरावे

कधीही मी इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोललो. राम आमचा पांडूरंग आहे. राम मांसाहारी होते, हे मी बोललो. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो, वाल्मिकी रामायणात सहा स्कंद आहेत. त्यात अयोध्या स्कंदातील सर्ग 552 आणि श्लोक 10, श्लोक 102 आहे. तो मी इथे वाचणार नाही. ते वाचून मला पुन्हा वाद वाढवायचा नाही. 1891चं डॉक्युमेंट आहे. वेस्ट बेंगालमध्ये प्रिंट केलेलं आहे. ममतानाथा दत्त यांनी अनुवाद केलं आहे. तेही मी वाचणार नाही. तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर कॉपी देतो. त्यात काय म्हटलं ते पाहा आणि मी काय म्हटलं ते पाहा, असं म्हणत आव्हाड यांनी पुरावेच दिले.

वाल्मिकी रामायणातील गोष्टींना आक्षेप आहे का?

आयआयटीतील पोरांनी मला अनेक पेपर्स पाठवले. का पाठवले हे माहीत नाही. त्या त्या काळात रामायणातील श्लोकांचा कसा अनुवाद झाला, ते माझ्याकडे उपलब्ध आहे. वाल्मिकी रामायणात जर काही लिहिलं असेल तर त्याला कुणाचा आक्षेप आहे का ? असेल तर सांगा, असा आव्हानच त्यांनी दिलं.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष...
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार