AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : ‘ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचं कुठून शिकलात’, केसरकरांच्या पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

'अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? असा खोचक सवाल आव्हाड यांनी केसरकरांना केलाय.

Jitendra Awhad : 'ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचं कुठून शिकलात', केसरकरांच्या पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाडImage Credit source: Google
| Updated on: Jul 13, 2022 | 7:31 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. आजपर्यंत शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप केसरकर यांनी पवारांवर केलाय. केसरकर यांनी पवारांवर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? असा खोचक सवाल आव्हाड यांनी केसरकरांना केलाय.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन केसरकरांवर निशाणा साधलाय. ‘अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका’ असा सूचक इशाराच आव्हाड यांनी केसरकरांना दिलाय.

दीपक केसरकरांची टीका काय?

दीपक केसरकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आजपर्यंत राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात आहे. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं, असं आव्हानच केसरकर यांनी पवारांना दिलं होतं.

केसरकर, निलेश राणेंमध्ये खडाजंगी

एकनाथ शिंदेंचा गट शिवसेनेतून बाहेर पडला तरीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंप्रति आमची निष्ठा असल्याचं शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनीही नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली. तसेच भाजप नेते निलेश राणे, नितेश राणे यांच्या सुपुत्रांनीही ठाकरे घराण्यावर सुरु असलेली टीका आता बंद करावीत. देवेंद्र फडणवीसांना सांगून आम्ही ही टीका बंद करू असं वक्तव्य केसरकरांनी केलं होतं. मात्र दीपक केसरकरांनाच निलेश राणे यांनी पुन्हा एकदा सुनावलं आहे. दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका…असा इशारा त्यांनी दिलाय. त्यामुळे राणे पुत्रांमुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.