पाच राज्यांच्या निकालानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

पाच राज्यांच्या निकालानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस


मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहता, भाजपचा विजयरथ रोखण्यास काँग्रेसने यश मिळवलं आहे. मध्य प्रदेशात टफ फाईट असताना, राजस्थानात मात्र काँग्रेसने एकहाती सत्तेकडे वाटचाल केली आहे. तर तिकडे छत्तीसगडमध्ये भाजपचा सुपडासाफ केला आहे. सोशल मीडियावरही या निकालांचे पडसाद पाहावयास मिळत आहेत. फेसबुक, ट्विटरवर विनोदांचा पाऊस पडत आहे.

पाच राज्यांचा निकाल

पाच राज्यांच्या निकालात काँग्रेसने आगेकूच केली आहे. पाचपैकी तीन राज्यात काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर छत्तीसगडमध्ये 90 पैकी तब्बल 60 जागांवर आघाडी घेतली आहे. तिकडे मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपात काँटे की टक्कर आहे. मिझोराममध्ये स्थानिक एमएनएफ आघाडीवर आहे तर तेलंगणात टीआरएसने बहुमताचा आकडा पार केला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोण सत्ता मिळवतं, याचा निर्णय आज जाहीर होत आहे.

सोशल मीडियावरील काही निवडक विनोद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI