मोठी बातमी | अभिनेते कमल हासन स्वतः निवडणूक रिंगणात, कोणत्या मतदारसंघातून लढणार?

अभिनेते कमल हासन यांनी आपण स्वतः आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

मोठी बातमी | अभिनेते कमल हासन स्वतः निवडणूक रिंगणात, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 5:53 PM

चेन्नई : तामिळनाडुमध्ये (Tamilnadu) पुढील वर्षी विधानसभा निवडणुका (Assembly Election) होत आहेत. या निवडणुकीत अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांचा पक्ष मक्कल नीधि माईमही (Makkal Needhi Maiam) निवडणूक रिंगणात असणार आहे. इतकंच नाही, तर स्वतः कमल हासन यांनीही आपण निवडणूक लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात तामिळनाडूच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची चर्चा आहे (Kamal Hassan announce that he will contest 2021 Tamilnadu Assembly Election).

कमल हासन यांनी स्वतः निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करतानाच लवकरच कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढू याची माहिती देऊ, असंही म्हटलं आहे. ते म्हणाले, “मी निश्चितच तामिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहे. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढेल याची घोषणा लवकरच करेल.”

“मदुरईला तामिळनाडूची दुसरी राजधानी बनवणार”

कमल हासन यांनी यावेळी मदुरईला तामिळनाडूची दुसरी राजधानी करणार असल्याचीही घोषणा केली. ते म्हणाले, “एपुरुषाथलीवर एमजीआर यांचं मदुरईला तामिळनाडुची दुसरी राजधानी करण्याचं स्वप्न होतं. आम्ही हे स्वप्न पूर्ण करु. मक्कल नीधि माईम (MNM) सत्तेत आल्यास मदुरईला तामिळनाडूची दुसरी राजधानी केलं जाईल.”

“मदुरई क्रांतीवरुन शहराचं नाव मदुरई ठेवण्यात आलं होतं. एमएनएम पक्ष लोकांच्या हितासाठीच राजकारण करण्यावर भर देईल. आमच्या पक्षाचे तरुण घरा-घरात जाऊन लोकांच्या भेटी घेतील. आता मी बोलण्याची वेळ आली आहे. उद्याचा काळ आपला असेल. भ्रष्टाचार कुणी एक व्यक्ती संपवू शकणार नाही. नागरिकांच्या सहकार्याने नक्कीच भ्रष्टाचाराचं निर्मूलन करता येऊ शकेल. आम्ही भ्रष्टाचाराला संपवू,” असाही विश्वास कमल हासन यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

माझ्या घराचे रुग्णालयात रुपांतर करा, कोरोना रुग्णांसाठी ‘या’ अभिनेत्याकडून मदतीचा हात

अर्धा देश उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? कमल हसन यांचा मोदींना सवाल

कमल हसनला गांधींजींकडे पाठवण्याची तयारी झाली : हिंदू महासभा

Kamal Hassan announce that he will contest 2021 Tamilnadu Assembly Election

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.