अनिल परबांशी संबंधित व्यक्तीवर किरीट सोमय्यांचा 100 कोटीच्या गैरव्यवहाराचा आरोप, दोन दिवसांत उघड करणार

अनिल परब यांचा परिचित व्यक्ती आणि एका अधिकाऱ्याचा 100 कोटीचा कोविड कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. डोंबिवलीत आज संध्याकाळी भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात किरीट सोमय्या, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक मंदार हळबे, मोरेश्वर भोईर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिल परबांशी संबंधित व्यक्तीवर किरीट सोमय्यांचा 100 कोटीच्या गैरव्यवहाराचा आरोप, दोन दिवसांत उघड करणार
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 10:13 PM

कल्याण : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. आता सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित व्यक्तीवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात भ्रष्टाचारात शिवसेनेनं जागतिक रेकॉर्ड केलाय. येत्या मंगळवारी मुंबई महापालिकेचा (Municipal Corporation Corporation) 100 कोटीचा घोटाळा उघड करणार. अनिल परब यांचा परिचित व्यक्ती आणि एका अधिकाऱ्याचा 100 कोटीचा कोविड कॉन्ट्रॅक्ट घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. डोंबिवलीत आज संध्याकाळी भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात किरीट सोमय्या, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक मंदार हळबे, मोरेश्वर भोईर आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमय्या यांनी शिवसेना खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार टीका केलीय. राऊत यांनी ईडीच्या नोटीसा फाडल्या. मात्र, त्यानंतर वॉरंट आल्यावर पाठच्या दरवाजाने जाऊन 55 लाख परत केले. चोरीचा माल परत केला म्हणून गुन्हा माफ होत नाही. मी लढणार, कोर्टात जाणार, संजय राऊत यांना शिक्षा झाली पाहिजे, असा इशाराच सोमय्या यांनी दिला आहे.

समीर वानखेंडेंच्या जन्मदाखल्यावरुन आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचे कोणतेही पुरावे मुंबई महापालिकेकडे नाहीत. आरोग्य विभागाकडून या संदर्भात माहिती घेतली आहे. त्यांना कुठून तरी झेरॉक्स मिळाली ती त्यांनी दाखवली, असा दावाही सोमय्या यांनी केलाय. महाराष्ट्रतील जनतेमध्ये उत्सुकता आहे की समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचे गूढ रहस्य मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर, नवाब मलिक आणि मुंबई पालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावे, असं आव्हानच सोमय्या यांनी यावेळी दिलंय.

एसटी कर्मचारी संपावरुन ठाकरे सरकारवर टीका

एसटी कर्मचारी संपावरुनही सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. संपाबाबत प्रश्न विचारला असता हे सरकार कोमाज जात आहे. त्याची काळजी आहे, अशी टीका सोमय्यांनी केलीय. शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. अनिल परब रोज म्हणतात की एसटी सुटली, एसटी गावाला निघाली पण एसटी कुठे आहे? असा सवालही सोमय्या यांनी केलाय.

इतर बातम्या :

Breaking : 10वी सोबतच 12वी बोर्ड परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास शाळांना मुदतवाढ

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, राज्यभरात विविध कार्यक्रम, पवारांनी सोशल मीडियावरुन मानले आभार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.