हसन मुश्रीफांचा पाय खोलात? किरीट सोमय्यांकडून ईडीकडे अजून कागदपत्र सुपूर्द

सोमय्यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्याबाबत ईडीकडे दिल्यानंतर आज त्यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र दिली आहे. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि परिवाराने बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.

हसन मुश्रीफांचा पाय खोलात? किरीट सोमय्यांकडून ईडीकडे अजून कागदपत्र सुपूर्द
किरीट सोमय्या, माजी खासदार


मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण, सोमय्यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्याबाबत ईडीकडे दिल्यानंतर आज त्यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र दिली आहे. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि परिवाराने बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. तसंच हसन मुश्रिफ यांना एक इशारा द्यायलाही सोमय्या विसरले नाहीत. (Kirit Somaiya hand over important documents to ED against Hasan Mushrif)

ज्या बेनामी कंपन्यांकडून त्यांनी किती पैसे घेतले. ते कुठे ट्रान्सफर केले, त्याचा किरीय सोमय्याचा ऑडिट रिपोर्ट आज ईडीला दिला. काही दिवसांपूर्वी सर सेनापती कागलमधील कारखान्याची माहिती दिली होती. आज आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याबाबत माहिती दिली आहे. या कारखान्यात 100 कोटी रुपये कशाप्रकारे आले? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी केलाय. ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत त्याच्या नावानं बँकेत खाते उडलं आणि त्यातून कारखान्यात पैसे आले. आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला दिला. राज्य सरकारकडूनही ब्रिक्स इंडियाला मदत करण्याचे आदेश देण्यात आले, या सगळ्या प्रकाराचा सातबारा आपण ईडीला दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

‘ब्रिक्स इंडिया’वरुन मुश्रीफांवर घणाघात

ब्रिक्स इंडिया ही हसन मुश्रीफ परिवाराची बेनामी कंपनी आहे. हजार कोटी नाहीतर एक लाख कोटीचा दावा दाखल करा. पण मी सांगतो की हसन मुश्रीफ आणि परिवार यांनी घोटाळ्याचा पैसा बेनामी कंपन्या, शेल कंपनीकडून या दोन कारखान्यात गुंतवणूक केली. त्याबाबत तपास सुरु आहे. या तपासाला गती मिळावी यासाठी ईडीला कागदपत्र दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

‘..पण किरीट सोमय्या थांबणार नाही’

दरम्यान, सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्याबाबत विचारलं असता हसन मुश्रीफांवर क्रिमिनल कारवाई करायची असेल तर मला कागलमध्ये तक्रार द्यावी लागेल. एक एफआयआर झाला की अन्य तपास यंत्रणांना मदत होते. पण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शलरद पवार यांच्या मार्गदर्शनाथाली मला सात तास घरी कोंडून ठेवलं. सीएसएमटीवर खोटी नोटीस दाखवली. त्यामुळे एफआयआर जरी काही दिवस थांबला असला तरी किरीट सोमय्या थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

वळसे-पाटील, उद्धव ठाकरेंनाही इशारा

त्याचबरोबर दिलीप वळसे-पाटील, उद्धव ठाकरे यांनी मला बेकायदेशीरपणे रोखलं, बोगस ऑर्डर दाखवली. त्याविरोधात मी आठवड्याभरात कोर्टात दाणार आणि मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही यावेळी सोमय्या यांनी सांगितलं.

सोमय्यांवरील कारवाईवर आघाडीत मतभेद?

शिविसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवरील कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही. गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे, असं आज वारंवार स्पष्ट केलं. त्यामुळे आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचं चित्रं असतानाच आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले. त्यामुळे आघाडीत समन्यवाचा अभाव असल्याचं उघड झालं आहे.

इतर बातम्या :

मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये पुन्हा पत्रसंघर्ष; केंद्राकडे बोट दाखवून पळता येणार नाही, दरेकर आक्रमक

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्ती, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला दणका

Kirit Somaiya hand over important documents to ED against Hasan Mushrif

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI