चिखलीत 15 वर्षानंतर कमळ फुलवलं, मिनी मंत्रालय ते विधानसभा; जाणून घ्या श्वेता महालेंचा राजकीय प्रवास

भाजपच्या आमदार श्वेता महाले या पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्या आहेत. (know about shweta mahale's political journey)

चिखलीत 15 वर्षानंतर कमळ फुलवलं, मिनी मंत्रालय ते विधानसभा; जाणून घ्या श्वेता महालेंचा राजकीय प्रवास
shweta mahale
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 7:55 PM

मुंबई: भाजपच्या आमदार श्वेता महाले या पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांना संसदीय कामाचा अनुभव आहे. शिवाय आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या आहेत. स्त्रियांच्या प्रश्नांपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत त्यांची ठाम मते आहेत. या प्रश्नांवर त्या नेहमीच आवाज उठवत असतात. श्वेता महाले यांच्या राजकीय कारकिर्दीचा हा घेतलेला आढावा. (know about shweta mahale’s political journey)

मिनी मंत्रालय ते विधानसभा

श्वेता महाले यांनी चिखलीतील जिल्हा परिषदेच्या उंद्री सर्कलचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण सभापती म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी सभापती असताना सर्कलसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत विभागातील कामे केली होती. या मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतल्यानंतर त्या थेट विधानसभेसाठी उभ्या राहिल्या आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या.

घरातूनच राजकारणाचं बाळकडू

महाले यांचे पती विद्याधर महाले हे प्रशासकीय खात्यात उच्चपदावर आहेत. त्यांच्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी त्यांना राजकीय वारसा लाभला आहे. भाजपचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. जिल्हा परिषदेत काम केल्यानंतर त्यांनी 2014मध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यावेळी त्यांची संधी हुकली. मात्र, 2019मध्ये संधी मिळताच त्यांनी या संधीचं सोनं केलं.

15 वर्षाचा वनवास संपवला

बुलडाण्यातील चिखली मतदारसंघात 15 वर्षापासून कमळ फुलले नव्हते. भाजपचा हा वनवास श्वेता महाले यांनी संपवला. महाले यांना भाजपने 2019मध्ये चिखलीतून उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर काँग्रेसचे राहुल बोंद्रे उभे होते. बोंद्रे या मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते. या अत्यंत चुरशीच्या लढतीत महाले या 6 हजार 851 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यांना 92 हजार 205 मते मिळाली. तर बोंद्रे यांना 85 हजार 433 मते मिळाली. त्यामुळे 2004नंतर भाजपला या मतदारसंघात प्रथमच विजय मिळविता आला.

दिल्लीची जबाबदारी

श्वेता महाले या सामाजिक जाण असलेल्या अभ्यासू आणि आक्रमक नेत्या आहेत. त्या चिखलीतून निवडून आल्यानंतर भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. भाजपने त्यांच्याकडे दिल्लीच्या मॉडेल टाऊन आणि सदर बाजार या दोन मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे त्या दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी या दोन्ही मतदारसंघात प्रचारासाठी गेल्या होत्या.

त्यांना अॅट्रोसिटी अॅक्टखाली आणा

महिलांच्या प्रश्नांवर श्वेता महाले नेहमीच आक्रमक असतात. पूजा चव्हाण प्रकरण असो, करुणा शर्मा प्रकरण असो की जळगाव जिल्ह्यातील महिलेचं प्रकरण असो, प्रत्येक प्रश्नावर त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. कधी उपरोधिक ट्विट करून तर कधी आंदोलन करून त्यांनी सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय. महिलांच्या आत्मसन्मानासाठी आई, बहिणींवरून देण्यात येणाऱ्या शिव्यांना गुन्हा ठरवून त्यांना अॅट्रोसिटी अॅक्टखाली आणण्याची मागणीही त्यांनी केली होती. महिलांचा अवमान करणाऱ्या या शिव्या समाजातून गेल्या पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

इतर प्रश्नांवर लढा

राज्यातील विविध प्रश्नावर महालेंनी आंदोलन केलं आहे. वीजबिल माफी, ट्रान्सफार्मर आणि लोडशेडिंगमुळे त्रस्त असलेल्यांना न्याय देणं, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्द्यांकडे त्यांनी सतत सरकारचे लक्ष वेधले. कोरोना काळात अकोला आणि बुलडाण्यात लॅब सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते.

‘ध्वनी रथा’तून जागरण

मार्च 2020मध्ये कोरोना आजार फैलावला. या आजाराची अनेकांना माहिती नव्हती. लोकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना त्याची माहिती मिळावी म्हणून त्यांनी ‘ध्वनी रथ’ तयार केला होता. त्यावर कोरोनाची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी याची माहिती होती. अडीच लाख मास्कचं वितरण, सॅनिटाझर्सचे वाटप, अन्नछत्राच्या माध्यमातून गरिबांची दोनवेळच्या अन्नाची व्यवस्था, कोविड सेंटरला आमदार निधीतून साहित्याचा पुरवठा आणि रक्तसाठ्याचं संकलन आदी कामे त्यांनी कोरोना काळात केली आहेत.

4 हजार गरोदर महिलांना फळांचं वाटप

कोरोना काळात ग्रामीण भागातील सुमारे 4 हजार गरोदर महिलांना त्यांनी डाळींब, चिकू, केळी, टरबूज, पपई आणि खरबूजचे पॉकेट घरपोच पुरवले. या महिलांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांनी हे काम केलं, तसेच फळे विक्रेत्यांचा धंदा बंद झाला होता. त्यामुळे त्यांच्याकडून फळे घेऊन त्यांचं होणारं आर्थिक नुकसानही त्यांनी टाळलं. या शिवाय आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींचं कन्यादानही त्यांनी केलं आहे.

कोण आहेत आमदार श्वेता महाले?

>> श्वेता महाले या बुलडाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार आहेत

>> भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या

>> 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा पराभव केला

>> 2004 नंतर चिखली मतदारसंघात पहिल्यांदाच भाजप उमेदवाराचा इथे विजय झाला होता

>> श्वेता महाले जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती होत्या

>> त्यांना भाजपने 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट दिलं होतं

>> मिळालेल्या संधीचं सोने करुन श्वेता महाले विधानसभेत पोहोचल्या (know about shweta mahale’s political journey)

संबंधित बातम्या:

आजीचा राजकीय वारसा, सख्ख्या बहिणीविरोधात निवडणूक लढल्या; वाचा, यशोमती ठाकूर यांचा राजकीय संघर्ष

अमरिशभाई पटेल यांना ‘ज्वेल्स ऑफ इंडिया’ का म्हणतात?; वाचा, सविस्तर

वडिलांबरोबर अयोध्येत कारसेवा, सव्वाशेपेक्षा अधिक आंदोलने; जाणून घ्या संघर्षशील नेत्या मनिषा कायंदेंबद्दल!

(know about shweta mahale’s political journey)

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....