RIP ND Patil | ‘आबाsss न्याय मिळायला पाहिजे’ असं एनडी पाटील आरआर पाटलांवर का ओरडले होते?

RIP ND Patil | 'आबाsss न्याय मिळायला पाहिजे' असं एनडी पाटील आरआर पाटलांवर का ओरडले होते?
एनडी पाटील यांची आर आर पाटील यांच्यासोबतची आठवण

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं सोमवारी (17 जानेवारी) निधनं झालं. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 17, 2022 | 10:50 PM

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या (Dr. Narendra Dabholkar) हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र तेव्हा हादरुन गेला होता. गोळ्या घालून दाभोलकरांची हत्या करण्यात आली आहेत. अनेक दिग्गज दाभोलकरांच्या अंत्यदर्शनासाठी हजर झाले होते. संपूर्ण राज्य शोकाकूल झालं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची झालेली हत्या हा सगळ्यांसाठी एक मोठा आघात होता. याचवेळी एनडी पाटीलदेखील दाभोलकरांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. तेव्हा नरेंद्र दाभोलकर यांच्या झालेल्या हत्येनं एनडी पाटील यांनाही हादरा बसला होता. अंत्यदर्शनावेळी एनडी पाटील यांनी तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्री असलेल्या आर आर पाटील यांना ओरडत एक विधान केलं. एन डी पाटील म्हणाले होते, की ‘आबाsss न्याय मिळायला पाहिजे!’ त्यांच्या या विधानाची आठवण आक अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्टवरुन पुन्हा एकदा सर्वासमोर मांडली आहे. एनडी पाटील यांच्या निधनानं अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलंय. त्यांच्या अनेक आठवणी सांगताना किरण मानेंची फेसबुक पोस्ट लिहित एनडी पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली एनडी पाटील यांचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की,…

मी पाच-सात वर्षांचा आशीन… माझे वडील-दादा मला बोट पकडून राजवाड्यावर घिवून जायचे…घरातनं निगताना आई म्हनायची, “आवो,कशाला नेताय त्याला? त्याला काय कळणारंय भाषणातलं?”.. दादा म्हणायचे,”नाय नाय..आसं कसं एन्. डी. पाटलांसारख्यांची भाषनं कानावर पडली पायजेत किरनच्या.”
…मला काही कळायचं नाय भाषनातलं… मी एन्.डी.पाटलांच्या आवाजातले चढऊतार, टाळ्या, एकाग्रतेनं ऐकनारी मानसं बघत बसायचो… कानावर कम्यूनिझम,समाजवाद,दडपशाही,ठोकशाही वगैरे शब्द पडायचे…काय कळायचं नाय..पन भाषनातलं कायतरी पाठ हुयाचं.. घरी आल्यावर दादा म्हनायचे, “आईला एन.डीं.चं भाषन म्हनून दाखव.” मी उभा र्‍हायचो.. माईक समोर हाय आसं इमॅजिन करायचो.. आन् आईदादाना फाडफाडफाड भाषन म्हनून दाखवायचो.. दादा खुश ! मग चिक्की खायला पैशे मिळायचे…
नंतर नंतर या मानसाचं मोठेपन उमगू लागलं..
…आज कळतंय. लढवय्येपना कुठनं मुरत-मुरत आलाय ते ! एन.डी.ना शेवटचं बघितलं डाॅ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंत्यदर्शनादिवशी… व्यथीत होऊन बसलेले एन.डी. तात्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा येताच ओरडले होते, “आबाSSS न्याय मिळायला पाहिजे”
तो आवाज अजून कानात घुमतोय !
ही माणसं पहाडासारखी होती.. वारसा जपायला पायजे…
-किरण माने

लढाऊ नेतृत्त्व हरपलं!

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं सोमवारी (17 जानेवारी) निधनं झालं. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलंय. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मे 2021 मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. त्यावेळी एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर एन. डी. पाटील यांना त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी खमकेपणाने साथ दिली.

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

शेतकरी, कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले, Nitin Gadkari यांचं Tweet | N .D. Patil Passes Away

एनडी पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणाले, आमच्या बहिणीचे काही चालले नाही, तिथे आमच्या व्हिपचे काय?; काय आहे किस्सा?

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें