Kokan Flood : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जेवढा खर्च, कोकणातील पूरग्रस्तांना तेवढीही मदत नाही – निलेश राणे

मंत्री उदय सामंत यांनी पूरग्रस्तांच्या खात्यावर मंगळवारी 5 हजार रुपये जमा होतील असं सांगितलं आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी राज्य सरकार आणि पर्यायानं शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.

Kokan Flood : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर जेवढा खर्च, कोकणातील पूरग्रस्तांना तेवढीही मदत नाही - निलेश राणे
निलेश राणे, माजी खासदार

मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस आणि महापुरानं थैमान घातल्यानंतर राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेला आता चार दिवस उलटूनही पूरग्रस्त नागरिकांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे चिपळूणमधील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. याबाबत विचारलं असता मंत्री उदय सामंत यांनी पूरग्रस्तांच्या खात्यावर मंगळवारी 5 हजार रुपये जमा होतील असं सांगितलं आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी राज्य सरकार आणि पर्यायानं शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. (Thackeray government is yet to help the flood victims in Konkan)

‘काय पाप केलंय कोकणाने शिवसेनेला निवडून देऊन, 10 हजार रुपयांसाठी तडफडायला लावतायत. शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाला 10 हजार पण एका झटक्यात नाही तर इंस्टॉलमेंटमध्ये. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांच्या दौऱ्यावर जो खर्च होतो तितकी पण मदत नुकसानग्रस्तांना मिळत नाही’, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.

‘..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते’

भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलीय. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. तसंच राऊतांवर जोरदार हल्लाही चढवला आहे. महामंडळं, पदं सगळ्या खास लोकांना. बाळासाहेबांचे निष्ठावंत दिसले नाहीत. बाटग्यांच्या माध्यमातून चालणारी शिवसेना आहे, असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिलंय. तसंच नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होतं होतं आणि आता धमक्यांची भाषा वापरली जातेय. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही. सेनाभवन आणि बाळासाहेबांबद्दल आदर आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवलाय.

संबंधित बातम्या : 

“भाजपमध्ये उपऱ्यांना स्थान नव्हतं, पण आता बाटगे पालखीत आणि मूळ लोक भंगारात, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय”

“सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल, खांदेकरी घेऊन या”

Thackeray government is yet to help the flood victims in Konkan

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI