LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी
Picture

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याचवेळात राजीनामा देणार

24/05/2019,6:19PM
Picture

मुख्यमंत्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

मुंबई : भाजपच्या विजयानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांचं देवदर्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, शिवसेनेचे अरविंद सावंतही मुख्यमंत्र्यांसोबत सिद्धिविनायच्या चरणी

24/05/2019,5:23PM
Picture

माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंचा पराभव सहन न झाल्याने तरुणाचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंचा पराभव सहन न झाल्याने तरुणाचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न, पांडुरंग शिंदे असे तरुणाचे नाव, बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु, माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील घटना

24/05/2019,2:51PM
Picture

राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, सोनिया गांधींनी राहुल गांधींना राजीनामा देण्यापासून रोखले, सूत्रांची माहिती

24/05/2019,12:49PM
Picture

मनी लाँडरिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांचा जामीन रद्द करण्याची मागणी

मनी लाँडरिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांचा जामीन रद्द करा, ईडीची दिल्ली हायकोर्टाला विनंती, काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाकडून रॉबर्ट वाड्रांना अंतरिम जामीन

24/05/2019,12:48PM
Picture

आम्ही आतून काय करु शकतो हे दाखवून दिलं : सुजय विखे

माझ्या वडिलांना उघडपणे प्रचारही करता आला नाही, पण आतून आम्ही काय करु शकतो हे दाखवून दिलं, वडिलांशिवाय ही निवडणूक लढणं शक्य नव्हतं, सुजय विखेंची प्रतिक्रिया

24/05/2019,12:52PM
Picture

बाप म्हणून मुलाच्या मागे उभं राहणे कर्तव्य : राधाकृष्ण विखे

डॉ. सुजय विखेंचा विजय आनंददायी, मी योग्य उमेदवारासाठी आग्रही होतो, पक्ष माझ्यामागे नसेल, तर मुलामागे उभं राहणं हे माझं कर्तव्य, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

24/05/2019,12:44PM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *