ड्युटीवर निधन झाल्याने हेमंत करकरे शहीद, त्यांची एटीएस प्रमुख म्हणून भूमिका अयोग्य : सुमित्रा महाजन

भोपाळ : दहशतवाद विरोधी पथकाचे दिवंगत प्रमुख हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्याबाबत भाजप उमेदवार प्रज्ञा ठाकूरने (Sadhvi Pragya) वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, आता लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हेमंत करकरे यांचं ड्युटीवर असताना निधन झालं त्यामुळे त्यांना शहीद मानलं जातं” असं सुमित्रा महाजन म्हणाल्या. सुमित्रा महाजन यांच्या या वक्तव्यानंतर मध्य …

ड्युटीवर निधन झाल्याने हेमंत करकरे शहीद, त्यांची एटीएस प्रमुख म्हणून भूमिका अयोग्य : सुमित्रा महाजन

भोपाळ : दहशतवाद विरोधी पथकाचे दिवंगत प्रमुख हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्याबाबत भाजप उमेदवार प्रज्ञा ठाकूरने (Sadhvi Pragya) वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, आता लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हेमंत करकरे यांचं ड्युटीवर असताना निधन झालं त्यामुळे त्यांना शहीद मानलं जातं” असं सुमित्रा महाजन म्हणाल्या.

सुमित्रा महाजन यांच्या या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

सुमित्रा महाजन नेमकं काय म्हणाल्या?

हेमंत करकरे यांचं ड्युटीवर निधन झालं, त्यामुळे त्यांना शहीद मानलं जाईल. मात्र एटीएस प्रमुख म्हणून हेमंत करकरे यांचं काम योग्य नव्हतं, असं सुमित्रा महाजन म्हणाल्या.

“हेमंत करकरे यांचे दोन पैलू होते. ते शहीद झाले कारण ते ड्युटीवर तैनात होते. मात्र एक पोलीस अधिकारी म्हणून त्यांची भूमिका योग्य नव्हती. आमचं म्हणणं हेच आहे की ती भूमिका अयोग्य होती”, असं सुमित्रा महाजन यांनी नमूद केलं.

सुमित्रा महाजन यांनी काँग्रेस नेते आणि भोपाळ लोकसभेचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यावरही निशाणा साधला.  त्या म्हणाल्या, “आमच्याकडे पुरावा नाही, मात्र असं ऐकण्यात येत होतं की दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे मित्र होते. दिग्विजय सिंह जेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बॉम्ब बनवण्याचा आणि दहशतवादी संघटनेचा आरोप केला होता”

दिग्विजय सिंहांचा पलटवार

दरम्यान, या आरोपानंतर दिग्विजय सिंह यांनी पलटवार केला. “सुमित्रा ताई, मला अभिमान आहे की तुम्ही माझं नाव अशोक चक्र विजेते शहीद हेमंत करकरे यांच्याशी जोडलात. तुमचे सहकारी त्यांच्या अपमान भलेही करो, मात्र मला गर्व आहे की मी नेहमीच देशहित, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेबाबत बोलणाऱ्यांच्या बाजूने आहे” असं दिग्विजय सिंह म्हणाले.

याशिवाय धार्मिक उन्माद करणाऱ्यांना माझा नेहमीच विरोध आहे. मला गर्व आहे की मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मी सिमी आणि बजरंगदल या दोन्ही संघटनांवर बंदीची शिफारस करण्याचं धाडस केलं होतं. माझ्यासाठी देश सर्वस्वी आहे, असंही दिग्विजय सिंह यांनी नमूद केलं.

साध्वी प्रज्ञाचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, यापूर्वी भोपाळमधील भाजपची लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिच्यावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर साध्वीने माफी मागितली होती.

प्रज्ञा ठाकूर म्हणाली होती, “हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं”, असं साध्वी म्हणाली.

मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञासिंगविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर तिने माफीही मागितली. शिवाय हे माझं वैयक्तिक मत होतं, असं स्पष्टीकरण दिलं.

संबंधित बातम्या 

अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली   

शहीद हेमंत करकरेंवरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *