अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली

भोपाळ (मध्य प्रदेश) :  भाजपची भोपाळची लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूरने संतापजनक वक्तव्य केलं आहे. मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं चीड आणणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञाने केलं आहे. भोपाळ लोकसभेची भाजपची उमेदवार असलेली साध्वी प्रज्ञा सिंहच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने […]

अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

भोपाळ (मध्य प्रदेश) :  भाजपची भोपाळची लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूरने संतापजनक वक्तव्य केलं आहे. मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं चीड आणणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञाने केलं आहे. भोपाळ लोकसभेची भाजपची उमेदवार असलेली साध्वी प्रज्ञा सिंहच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं, असं साध्वी म्हणाली.

एका सभेत साध्वी म्हणाली, “तपास अधिकारी सुरक्षा समितीचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरेंना बोलवून मला सोडण्यास सांगितलं होतं. मात्र हेमंत करकरेंनी नकार देत, मी काहीही करुन पुरावे आणेन, पण साध्वीला सोडणार नाही असं म्हटलं होतं”

हेमंत करकरेंची ही कूटनीती होती, देशद्रोह होता, धर्मविरोध होता. ते मला विचारत होते मला सत्यासाठी देवाकडे जावं लागेल का, तेव्हा मी त्यांना म्हणाले तुम्हाला वाटत असेल तर जा, असं साध्वीने सांगितलं.

साध्वी प्रज्ञाने शहीद हेमंत करकरेंची तुलना कंसाशी केली. कंसाचा वध जसा श्रीकृष्णाने केला, तसंच देवाने वध केला, असं साध्वी म्हणाली.

भगवान राम कालात रावण झाला, त्याचा अंत संन्यासांद्वारे झाला. द्वापारयुगात कंस झाला तेव्हा त्याचा अंत करण्यासाठी श्रीकृष्ण आला, असं साध्वी बरळली.

हेमंत करकरे कोण होते?

हेमंत करकरे हे दहशतवादविरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी होते. मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले होते.

याशिवाय हेमंत करकरे मालेगाव साखळी बॉम्ब स्फोटाचे तपास अधिकारी होते. याच खटल्यात साध्वी प्रज्ञा आरोपी होती.

हेमंत करकरे यांचा जन्म 12 डिसेंबर 1954 रोजी झाला होता. 1982 मध्ये ते आयपीएस अधिकारी झाले. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस सहआयुक्त पद भूषवणारे करकरे हे नंतर दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख बनले.

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांना भारत सरकारने अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संपूर्ण व्हिडीओ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.