AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडी सरकार स्थिर; विरोधकांचं कटकारस्थान पूर्ण होणार नाही: नवाब मलिक

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि खंबीर आहे. (maha vikas aghadi government stable and strong, says nawab malik)

आघाडी सरकार स्थिर; विरोधकांचं कटकारस्थान पूर्ण होणार नाही: नवाब मलिक
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
| Updated on: Mar 24, 2021 | 1:28 PM
Share

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आणि खंबीर आहे. या सरकारचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे, असं सांगतानाच आघाडी सरकार अस्थिर करण्याचं विरोधकांचं कटकारस्थान पूर्ण होणार नाही, असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. (maha vikas aghadi government stable and strong, says nawab malik)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवर नवाब मलिक यांनी सडकून टीका केली. राज्यपालांच्या भेटीनंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे, असे भाजप सांगत आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कटकारस्थानाच्या विरोधकांच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

जयस्वाल पैसे घेऊन शिफारस करत होते का?

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पैसे खाण्यात आले आहे हे रश्मी शुक्लाच्या रिपोर्टच्या आधारावर फडणवीस आरोप करत राहिले. एक पान फक्त प्रेसला द्यायचे आणि पूर्ण रिपोर्ट द्यायचा नाही. त्या रिपोर्टमध्ये नावे आहेत, त्यानुसार बदल्या झाल्या नाहीत. फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. बदलीची प्रक्रिया काय आहे हे त्यांना माहित नाही का? बदल्या अशाच होत नाहीत. त्याच्यात बोर्ड आहे. एसीएस होमच्या अध्यक्षतेखाली ते बोर्ड असते. हे बोर्ड बदल्यांची शिफारसी करते. कनिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचा बोर्ड हा डीजीच्या अखत्यारीत असतो. म्हणजे सुबोध जयस्वाल हे पैसे घेऊन नावांची शिफारस करत होते का?, असा गंभीर सवाल मलिक यांनी केला आहे.

म्हणून भाजपचे उपद्रव

त्या रिपोर्टच्या आधारावर सरकारला बदनाम करण्याचे काम फडणवीस करत होते. कालच फडणवीस यांचे असत्य काय आणि सत्य काय हे जनतेसमोर ठेवले आहे. भाजपाला सत्तेशिवाय राहता येत नाही म्हणून ते हे सगळे उपद्रव करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

… तर भाजपला पळता भूई थोडी होईल

यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेत्यांनी काल राज्यातील एकंदर राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपाची सत्तेच्या हव्यासापोटी सुरू असलेली थेरं आम्ही पाहत आहोत. संवैधानिक पदांचा दुरुपयोग व संवैधानिक मर्यादांचे उल्लंघन केले जात आहे, यावर आमचे लक्ष आहे. भाजपाचे षडयंत्राची आम्हाला माहिती आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले होते. पाच वर्षांत भाजपाने केलेले काळे कारनामे आम्हाला पूर्णपणे माहित आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर भाजपची पळता भुई थोडी होईल. योग्य वेळी ते होईलच! त्या वेळेची वाट पहावी, असा इशाराही त्यांनी दिला. (maha vikas aghadi government stable and strong, says nawab malik)

संबंधित बातम्या:

सर्वोच्च न्यायालयाचा परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार; उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला

मुंबई पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांच्या भेटीला, सु्प्रीम कोर्टातील सुनावणीनंतर देशमुख-नगराळे भेट

परमबीर सिंग प्रकरण भविष्यात भाजपवरच उलटल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत

(maha vikas aghadi government stable and strong, says nawab malik)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.