पुण्याच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्र्यांचं पावणे तीन क्विंटलचा हार घालून स्वागत

21 कारागिरांनी एका दिवसात हा हार बनवलाय. योगेश टिळेकर यांनी हा भव्य दिव्य हार घालून स्वागत तर केलं, त्यामुळं टिळेकर यांच्या गळ्यात आमदारकीच्या उमेदवारीची माळ पडते का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

पुण्याच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्र्यांचं पावणे तीन क्विंटलचा हार घालून स्वागत

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचं पुण्यात (Mahajanadesh Yatra Pune) आगमन झालं. यावेळी ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत (Mahajanadesh Yatra Pune) करण्यात आलं. पुण्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच हडपसर मतदारसंघात त्यांच्या स्वागतासाठी तब्बल 270 किलोचा भव्य हार तयार करण्यात आला होता. 21 कारागिरांनी एका दिवसात हा हार बनवलाय. योगेश टिळेकर यांनी हा भव्य दिव्य हार घालून स्वागत तर केलं, त्यामुळं टिळेकर यांच्या गळ्यात आमदारकीच्या उमेदवारीची माळ पडते का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

महाजनादेश यात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार गिरीश बापट, संजय काकडे, आमदार योगेश टिळेकर, महापौर मुक्ता टिळक आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचं फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत केलं जात होतं. माञ मुख्यमंत्री ते थांबवत, आपण स्वच्छ भारत अभियान करणारे आहोत, असं म्हणाले.

हडपसरनंतर महाजनादेश यात्रा स्वारगेट, सारसबाग, टिळक रोड, अलका चौक, नळस्टॉप, शिवाजीनगर आणि वडगावशेरी या मार्गाने पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा रात्री उशिरा पार पडला. यावेळी ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून कार्यकर्त्यांनी स्वागत केलं.

अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या विजय घोषणा दिल्या जात होत्या. त्याचबरोबर फुलांचा वर्षाव केला जात होता. मुख्यमंत्रीही उपस्थित कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना अभिवादन करत होते. रस्त्यावर सर्वत्र भाजपाचे झेंडे लागल्याने शहर भाजपमय झालं होतं. महाजनादेश यात्रेची दृश्य कैद करण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा वाहतूक कोंडीलाही मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी मनस्तापही व्यक्त केला. हडपसरपासून संपूर्ण महाजनादेश यात्रेवर वाहतूक कोंडीची समस्या कमी-अधिक प्रमाणात जाणवत होती.

रविवारी सकाळी महाजनादेश यात्रेचा पुणे शहरातील दुसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात सिंहगड मार्गावरून महाजनादेश यात्रा जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. महाजनादेश यात्रेतील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला बाधा येऊ नये म्हणून ठिकठिकाणी फांद्यांवर कुऱ्हाड चालविण्यात आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *