भाजपने बीड जिल्ह्यात खातं उघडलं

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) मतमोजणीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. अशातच आता बीडमध्ये देखील भाजपने आपलं खातं उघडलं आहे.

भाजपने बीड जिल्ह्यात खातं उघडलं
Follow us
| Updated on: Oct 24, 2019 | 2:21 PM

बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) मतमोजणीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. अशातच आता बीडमध्ये देखील भाजपने आपलं खातं उघडलं (First Victory of BJP in Beed) आहे. गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार आणि केजमधून नमिता मुंदडा यांनी विजय मिळवत भाजपचं बीडमधील खातं उघडलं आहे.

बीड जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी केज विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच चर्चेत होती. राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून निवडणूक लढली. त्यांनी केजमधून विजय मिळवला आहे.

बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांनी 2759 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे 15114 मतांनी आघाडीवर आहेत. माजलगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके 13348 मतांनी आघाडीवर आहेत.

परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे 28116 मतांनी आघाडीवर आहेत.

बीड जिल्ह्याची निवडणूक (Beed Assembly Election) राज्यातील हायप्रोफाईल लढतींपैकी एक होती. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अस्तित्वाची लढाई लढली. 2014 मध्ये बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत.

बीड

बीड विधानसभा मतादरसंघात यावेळी काका-पुतण्याची लढत झाली. जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेकडून उमेदवार होते, तर पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. 2014 ला जयदत्त क्षीरसागर विरुद्ध भाजपकडून विनायक मेटे यांच्यात थेट लढत झाली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड शहरात विनायक मेटे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. मात्र, त्यानंतरही जयदत्त क्षीरसागर यांनी विनायक मेटेंचा 5 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. यावेळी मात्र, त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर काका जयदत्त क्षीरसागर यांना धोबीपछाड करताना दिसत आहेत.

परळी

राज्यातील सर्वात हायप्रोफाईल लढत परळीत झाली. पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यात झालेली ही लढत अखेरच्या काळात भावनिक चढउतारांनंतर चांगलीच चर्चेत आली. याचा फायदा होऊन पंकजा मुंडे यांचा विजय होईल, असंही बोललं गेलं. अनेक एक्झिट पोलने देखील परळीची जागा पंकजा मुंडेच जिंकत असल्याचं सांगितलं. मात्र, धनंजय मुंडे यांनी सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरवत जोरदार विजय मिळवला आहे. पंकजा मुंडेंनी 2014 ला 25895 मतांनी धनंजय मुंडेंवर मात केली होती.

गेवराई

2014 ला भाजपचे उमेदवार लक्ष्मण पवार यांनी 60 हजारपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. यावेळीही भाजपने लक्ष्मण पवार यांनाच उमेदवारी दिली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयसिंह पंडीत हे निवडणूक रिंगणात होते.

माजलगाव

माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना आर. टी. देशमुख यांनी 37245 मतांनी पराभूत केलं होतं.

आष्टी

आष्टी-पाटोदा-शिरुर हा मतदारसंघ बीडमध्ये भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ मानला जातो. गेल्या निवडणुकीत 2 लाख 50 हजार 502 मतदारांनी (73.70 टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपचे भिमराव धोंडे 48.30 टक्के मतं घेऊन विजय झाले, तर तेव्हाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनीही कडवी झुंज देत 45.90 टक्के मतं घेतली होती. धोंडे फक्त 5982 मतांच्या फरकाने जिंकले.

केज

2014 ला भाजपच्या उमेदवार संगिता ठोंबरे यांनी 42 हजार 721 मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात नमिता मुंदडा या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. पण यावेळी मतदारसंघातील स्थानिक समीकरणं बदलून नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही मुंदडा यांनी केजमधून विजय मिळवला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.