मुंबई : राज्यातील 6 जिल्हात महापुरानं घातलेलं थैमान, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि दरड कोसळून झालेले 100 पेक्षा अधिक मृत्यू, या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीत पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे संकेतही मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. अशावेळी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तीन महत्वाचे मुद्दे ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. तसंच या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना टोलेही लगावले आहेत. (Keshav Upadhyay presented 3 important points on the background of the state cabinet meeting)