Maharashtra Flood : पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत पवारांच्या आवाहनाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर! काय म्हणाले फडणवीस?

पवार साहेबांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या 3 दिवसांत करणारचं आहे', असं फडणवीस म्हणाले.

Maharashtra Flood : पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत पवारांच्या आवाहनाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर! काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस, शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 3:40 PM

मुंबई : राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. त्याबाबत माध्यमांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, फडणविसांनीही पवारांचा सल्ला योग्य असल्याचं सांगत आपला दौरा मात्र सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलंय. (Devendra Fadnavis’s reaction to Sharad Pawar’s Appeal for a tour of the flood-hit area)

‘पवार साहेबांनी जे काही आवाहन केलं आहे त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की, दौरे करताना दौरे करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपुढे मांडता येतो. त्यामुळे पवार साहेबांच्या आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या 3 दिवसांत करणारचं आहे’, असं फडणवीस म्हणाले.

भाजपकडून कोकणात 9 ट्रक माल रवाना

दरम्यान, आज मुंबई भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं कोकणात 9 ट्रक माल पाठवण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. त्यात प्लास्टिकच्या चटच्या, घरगुती वापराच्या वस्तू, सॅनीटरी पॅडपासून सगळं असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही रोज काहीना काही पाठवण्याचा प्रयत्न करु. आम्ही जेव्हा कोकणाचा दौरा केला तेव्हा हे लक्षात आलं की तिथे घरात किंवा दुकानात काहीच उरलेलं नाही अशी स्थिती आहे. तिथली गरज ओळखून आवश्यक असणारी सामग्री आम्ही पाठवत आहोत, असं फडणवीस म्हणाले.

राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार राज्यपाल पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांचा दौरा हा राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपालांकडे फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी चार प्रमुख पक्षांच्या एका आमदार किंवा खासदाराला बोलावलं होतं. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेते राज्यपालांसोबत आले नाहीत. ते का आले नाहीत मला माहिती नाही. मात्र, आमचे आशिष शेलार राज्यपालांसोबत गेले हे योग्य आहे, असंही फडणवीसांनी आवर्जुन सांगितलं.

संबंधित बातम्या :

Sharad Pawar : महाराष्ट्राला महापुराचा तडाखा; शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

Taliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन

Devendra Fadnavis’s reaction to Sharad Pawar’s Appeal for a tour of the flood-hit area

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.