हारना और डरना मना है, संजय राऊतांचे ट्विट

एकमेकांचे कट्टर विरोधक मानले गेलेले शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत संकेत मिळत आहे. दरम्यान नुकतंच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं (Sanjay Raut tweet) आहे.

हारना और डरना मना है, संजय राऊतांचे ट्विट
Follow us
| Updated on: Nov 14, 2019 | 9:54 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्तास्थापनेबाबत बैठकांवर बैठका सुरु (Sanjay Raut tweet) आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यातच सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. राज्यात एकीकडे युतीत असणारे भाजप-शिवसेना मित्रपक्षांचे गणित बिघडले (Sanjay Raut tweet) आहे. तर दुसरीकडे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले गेलेले शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत संकेत मिळत आहे. दरम्यान नुकतंच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं (Sanjay Raut tweet) आहे.

हार हो जाती है, जब मान लिया जाता है. जीत तब होती है, जब ठान लिया जाता है असे या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर या ट्विटला कॅप्शन देताना अब हारना और डरना मना है..असेही त्यांनी म्हटलं आहे. एखादा तेव्हाच हरतो जेव्हा त्यांनी मी हरलो असे मान्य केलेलं असतं आणि तेव्हाच जिंकतो जेव्हा तो आपल्या मनाशी निर्धार करतो असे त्यांना ट्विटमधून सुचवायचे आहेत. आता हरणार नाही आणि घाबरणारही नाही असे त्यांनी म्हटलं (Sanjay Raut tweet) आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ट्विट केले. ‘लहरों से डरकर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नही होती’, या कवितेच्या ओळी ट्विट करत ‘हम होंगे कामयाब, जरूर होंगे’, असे ट्विट त्यांनी केले (Sanjay Raut tweet) होते.

विधानसभा निवडणुकांचा निकालानंतर राजकीय रणधुमाळीत संजय राऊत चांगलेच सक्रीय झाले. भाजप-शिवसेनेत ठरल्याप्रमाणे सत्तावाटप होत नसल्याने संजय राऊत यांनी रोज पत्रकार परिषद घेतली. यावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. एवढंच नव्हे तर त्यांनी ट्विटरवरुनही व्यक्त होण्यास सुरुवात केली.

सत्तासंघर्ष कसा चालला?

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र भाजपने शिवसेनेची इच्छा नसल्याचं रविवारी (10 नोव्हेंबर 2019) सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष शिवसेनेला आवताण दिलं होतं.

शिवसेनेने सोमवारी रात्री (11 नोव्हेंबर 2019) राज्यपालांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागली. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडच्या बैठकांचं सत्र सुरु होतं. त्यातच झालेल्या दिरंगाईमुळे शिवसेनेला केवळ सत्तास्थापनेचा दावा करता आला, मात्र बहुमतासाठी लागणारी दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रं राज्यपालांकडे सादर करता आली नाहीत. आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ मागितला. पण राज्यपालांनी त्याला नकार (Sanjay Raut tweet) दिला.

राज्यपालांनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसला मंगळवारी रात्री (12 नोव्हेंबर 2019) 8.30 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र त्याआधी राष्ट्रवादीनेही मुदतवाढ मागितली. परंतु राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही वेळ वाढवून देण्यास नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने मंगळवार 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

Non Stop LIVE Update
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.