न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी ट्विस्ट, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं मोठं विधान

'मला अनेकांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली. पण कुणीही पुरावे सादर केले नाहीत', असं अनिल देशमुख म्हणाले.

न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी ट्विस्ट, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Jan 24, 2020 | 6:00 PM

मुंबई : न्यायमूर्ती बी.एच. लोया मृत्यूप्रकरणी आता पुन्हा एक ट्विस्ट आला आहे (Anil Deshmukh). पुराव्यांअभावी न्यायमूर्ती बी.एच. लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी होऊ शकणार नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे (Anil Deshmukh On Loya Case). ‘मला अनेकांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली. पण कुणीही पुरावे सादर केले नाहीत’, असं अनिल देशमुख म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार नाही.

न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी काही लोकांनी अनिल देशमुखांशी संपर्क साधला होता. तसेच, काही पुरावे देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र, अद्याप कुठले पुरावे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे न्यायमूर्ती बीएच लोया मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात येणार नाही (Anil Deshmukh On Loya Case).

न्यायमूर्ती लोया हे सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी करत होते. या खटल्यातील मुख्य आरोपी हे अमित शाह होते.

फोन टॅपिंग प्रकरणी चौकशीचे आदेश

तसचे, सध्या राज्यात नेत्यांच्या फोन टॅपिंगवर वाद सुरु आहे. गृहमंत्र्यांनी सांगितलं की, तत्कालीन सरकारदरम्यान विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याची तक्रार आहे. या प्रकरणी तपास होईल. गृह मंत्र्यालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संजय राऊतांनीही फोन टॅपिंगबाबत ट्वीट केलं आहे.

‘तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने (त्यावेळी) दिली होती. मी म्हणालो होतो, भाईसाहेब, माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, तर स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. ऐका माझं बोलणं’ असं संजय राऊत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

न्यायामूर्ती लोया मृत्यू प्रकरण

जस्टिस ब्रिजगोपाल लोया हे गुजरातमधल्या सोहराबुद्दीन बनावट एन्काऊन्टर प्रकरणात CBI कोर्टाचे न्यायाधीश होते. याच खटल्यात भाजप अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही आरोप असल्याने हा खटला राजकीयदृष्ट्याही संवेदनशील झाला होता. नागपूरमध्ये एका लग्नसोहळ्याला गेलेले असताना लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी संशयास्पद मृत्यू झाला. जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे सांगण्यात येत आहे. मात्र लोया यांच्या मृत्यूनंतर सोहराबुद्दीन एन्काऊन्टर खटल्यातून अमित शाह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाचा चौकशीला नकार

विरोधकांचा आरोप आहे की, न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिक नसून या मागे काही घातपात असल्याची शक्यता आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता. या प्रकरणाची चौकशी करण्यास सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच नकार दिला आहे.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.