कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही: बाळासाहेब थोरात

गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून काँग्रेस मंत्र्यांच्या खात्याला निधी मिळत नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. | Balasaheb Thorat

कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही: बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 3:02 PM

नाशिक: महाविकासाआघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी फेटाळून लावला. आमच्यात काही वाद नाहीत, काँग्रेस पक्षही कोणावर नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले. (Balasaheb Thoarat denied buzz about Congress is not happy in Maha Vikas Aghadi govt)

ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोरोनावर खर्च होत असल्यामुळे सरकारी तिजोरीतील निधी कमी पडतो. सध्या पैशांची आवकही कमी आहे आणि खर्च जास्त आहेत. त्यामुळे काही खात्यांना निधी कमी पडत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून काँग्रेस मंत्र्यांच्या खात्याला निधी मिळत नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. मध्यंतरी राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील आदिवसींना खावटी मदत देण्यासाठी 467 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला होता. यामध्ये रोख रक्कम आणि अन्नधान्याच्या स्वरुपातील मदतीचा समावेश होता. दिवाळीपूर्वी आदिवासींना ही मदत मिळावी, यासाठी या खात्याचे मंत्री के.सी. पाडवी आग्रही होती.

या प्रस्तावाच्या अंमलबाजवणीसाठी निवीदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, शेवटच्या टप्प्यात अजित पवार यांच्या अखत्यारितील अर्थ खात्याने निधीची चणचण असल्याचे सांगून हा प्रस्ताव नाकारला होता. त्यामुळे के.सी. पाडवी प्रचंड नाराज झाले होते.

तर दुसरीकडे उर्जामंत्री नितीन राऊत यांचा वीज बिलातील सवलतीचा प्रस्तावही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उदासीनतेमुळेच बारगळल्याची चर्चा आहे. वीज बिलात सवलत देण्यासाठी सरकारी तिजोरीत निधी नसल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना सांगण्यात आले. त्यामुळेच नितीन राऊत यांनी ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत वीज बिले भरावीच लागतील, अशी भूमिका घेतली. यावरुन सध्या महाविकासआघाडी सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत आहे.

आमच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना, काँग्रेसची पुन्हा खदखद महसलूमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही थोरात म्हणाले. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील काही दिवसांपूर्वी काँग्रेच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे म्हटले होते.

संबंधित बातम्या:

काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही, आधी जनतेने झिडकारलं, आता महाविकास आघाडी : आशिष शेलार

कॅबिनेटची नोट तयार होती, पण फक्त काँग्रेसला श्रेय मिळेल म्हणून निर्णय घेतला नाही : मनसे

आमच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना, काँग्रेसची पुन्हा खदखद

बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, थोरातांचा हल्लाबोल

(Balasaheb Thoarat denied buzz about Congress is not happy in Maha Vikas Aghadi govt)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.