MLC Polls LIVE : 21 तारखेला निवडणूक, उद्धव ठाकरे 21 तारखेलाच आमदार?

कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे.

MLC Polls LIVE : 21 तारखेला निवडणूक, उद्धव ठाकरे 21 तारखेलाच आमदार?
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 3:03 PM

मुंबई : कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच (Maharashtra legislative council polls) सुटला आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.

Maharashtra legislative council polls LIVE Update

  • देश कोरोनाविरोधात लढत असताना, काही लोकांचं लक्ष सरकार अस्थिर कसं होईल याकडेच होतं, त्यासाठी त्यांनी बराच वेळ घालवला, आता झालं गेलं विसरुन ही निवडणूक बिनविरोध कशी होईल हे पाहू – राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील
  • राज्यपालांना विनंती केली होती, लवकर निर्णय होणे अपेक्षित होतं, मात्र झाला नाही, त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला विनंती करुन ९ जागांसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली, ती मान्य झाली, आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शंभर टक्के निवडून येतील – जयंत पाटील
  • अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते, हे सरकार अस्थिर होईल याचे प्रयत्न झाले, त्या सर्वांना यामुळे चपराक बसली – जयंत पाटील
  • महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी 21 मे रोजी निवडणूक, त्याच दिवशी निकाल

विधानपरिषदेच्या 9 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

  • 4 मेपासून 11 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार
  • 12 मे – उमेदवार अर्जांची छाननी
  • अर्जमाघारीसाठी 14 मे पर्यंतची मुदत
  • 9 जागांसाठी 21 मे रोजी मतदान
  • मतदानाच्या दिवशीच मतमोजणी
  • 26 मे पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण

उद्धव ठाकरेंचा पेच सुटला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु होते. उद्धव ठाकरे यांचं नाव राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही पाठवण्यात आलं आहे. मात्र राज्यपालांनी त्याबाबत अद्याप निर्णय न घेता, त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं.

कोणत्या जागांसाठी निवडणूक

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक अपेक्षित आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला, विधानपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर

शिवसेनेचं राज्यपालांना, राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र, रिक्त जागांच्या निवडणुकीची मागणी

विधानपरिषद बरखास्त करता येते का? देशात किती राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात?

Non Stop LIVE Update
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.