मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार का?, संजय राठोड म्हणाले…

"माझं रितसर काम सुरु झालंय. तसंच माझ्या शासकीय कामांना देखील मी सुरुवात करतोय. त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीसाठी मी मुंबईला रवाना होतोय", असं संजय राठोड म्हणाले. | Sanjay Rathod

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:06 AM, 24 Feb 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार का?, संजय राठोड म्हणाले...
संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide) प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आणि पोहरादेवीत (pohradevi) शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आज वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) मुंबईच्या दिशेने कॅबीनेट बैठकीसाठी रवाना झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार का?, असा सवाल विचारल्यावर वेळ मारुन नेत मी कॅबीनेट बैठकीसाठी चाललोय, असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. (Maharashtra Minister Sanjay Rathod on Cm uddhav thackeray)

“माझं रितसर काम सुरु झालंय. तसंच माझ्या शासकीय कामांना देखील मी सुरुवात करतोय. त्याच अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीसाठी मी मुंबईला रवाना होतोय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. काल पोहरादेवी इथं हजारोंची गर्दी जमवून ओंगळवाणं शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आज ते कॅबीनेट बैठकीसाठी हजेरी लावणार का, असा प्रश्न होता. मात्र खुद्द राठोड यांनीच मी मंत्रिमंडळ बैठकीसाठी निघालो असल्याची प्रकिक्रिया दिली आहे.

लोकांनी कोरोनाला गांभीर्याने घेतलं नाही

पोहरादेवीच्या कालच्या गर्दीच्या प्रश्नावर उत्तर देताना राठोड म्हणाले, “खरंतर लोकांनी कोरोनाचे नियम पाळायला हवेत, पण लोकांनी कोरोनाला सिरीयस घेतलं नाही.
लोकांना कोरोनाचं गांभीर्य नाही”

…यावर मला बोलायचं नाही

माध्यमांशी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आज पुन्हा राठोड यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, “माझी भूमिका मी कालच मांडली आहे. मला आता या प्रकरणावर काहीही बोलायचं नाही. माझं रितसर काम सुरु झालंय. तसंच माझ्या शासकीय कामांना देखील मी सुरुवात करतोय.”

कॅबिनेट बैठकीला हजेरी लावणार

संजय राठोड सकाळी 9 वाजून  40 मिनिटांच्या आसपास आपल्या यवतमाळच्या निवासस्थानावरुन नागपुरच्या दिशेने निघाले. सकाळी 11 वाजता ते नागपूरला पोहोचतील. सव्वा अकराच्या विमानाने ते नागपूरहून मुंबईच्या दिशेने प्रयाण करतील.

पोहरादेवी गर्दीवर मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

(Maharashtra Minister Sanjay Rathod on Cm uddhav thackeray)

हे ही वाचा :

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात….