AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election 2021: धुळे-नंदुरबारमध्ये भाजपाचे पारडं जड; महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागणार

विधानपरिषदेच्या नंदुरबार धुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने अनुभवी असलेल्या अमरिश पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Maharashtra MLC Election 2021: धुळे-नंदुरबारमध्ये भाजपाचे पारडं जड; महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागणार
अमरिश पटेल, गौरव वाणी
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 12:10 PM
Share

नंदुरबार: विधानपरिषदेच्या नंदुरबार धुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने अनुभवी असलेल्या अमरिश पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपनं अमरिश पटेल यांना उमेदवारी जाहीर करुन त्यांचं पारडे जड केले आहे. काँग्रेसने अर्थात महा विकास आघाडीने नवख्या असलेल्या गौरव वाणी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपचं पारडं जड

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यापासून भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीची मतदार संख्या 199 इतकी आहे. महाविकास आघाडीची मतदार संख्या कमी झाली आहे. महाविकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या धडगाव आणि साक्रीमध्ये नगरपंचायत स्थापन झाल्यानं महाविकास आघाडीची 34 मत कमी झाली आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी सोपी झाल्याचे राजकीय विश्लेषक रणजित राजपूत यांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडी काय भूमिका घेणार

विधान परिषद निवडणूक असो की झालेली पोटनिवडणूक यासाठी काँग्रेस नेत्यांनी नेहमीच बोटचेपी भूमिका घेतली आहे. अमरिश पटेल यांच्या विरोधात त्यांनी नेहमीच नवखा उमेदवार देऊन त्यांनाही लढाई सोपी करून दिली आहे. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडे मतदार संख्या अधिक असतानाही लाजीरवाणा पराभव वाट्याला आला होता. आजही एकोप्याने सर्वांनी प्रयत्न केला तर ही निवडणूक भाजपाला वाटते तितकी सोपी जाणार नसल्याचे भाकीत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. एकूणच विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका काय राहील हेच महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपा उमेदवाराला आव्हान देणारा उमेदवार यावेळेसही महा विकास आघाडीला देता आलेला नाही. एकूणच अशी परिस्थिती असली तरी भाजपातील काही नाराज आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक दिलाने ही निवडणूक लढवली तरी नवखा उमेदवार गौरव वाणी कडवी झुंज देईल हे मात्र निश्चित.

धुळे-नंदुरबार पक्षीय बलाबल

भाजप……….199 काँग्रेस……….136 राष्ट्रवादी………20 शिवसेना……..20 एमआयएम……09 समाजवादी…….04 बसप………….01 मनसे………….01 अपक्ष………….09 एकूण………….399

इतर बातम्या:

पपईला वेगळा पर्यांय निवडला मात्र तोही फसला, मग शेतकऱ्याने उभ्या पिकावरच नांगर फिरवला

‘फरार’ परमबीर सिंग अखेर मुंबईत, कांदिवलीत गुन्हे शाखेकडून चौकशी

आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

Maharashtra MLC Election 2021 Dhule Nandurbar election BJP have advantage after declaration of Amrish Patel

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.