Maharashtra MLC Election Result 2021 Live : हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक, भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात: देवेंद्र फडणवीस

| Updated on: Dec 14, 2021 | 2:08 PM

Maharashtra MLC Election Result 2021: अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांच्यात चुरशीची लढत झाली. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विजयी झाले आहेत.

Maharashtra MLC Election Result 2021 Live : हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक, भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात: देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे

Maharashtra MLC Election Result 2021  नागपूर: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Election Result) नागपूर (Nagpur) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana ) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  विजयी झाले आहेत. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला ते पराभूत झाले आहेत

नागपूरमध्ये भाजपचा विजय

नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर (Dr Ravindra Bhoyar aka Chhotu Bhoyar) यांना काँग्रेसकडून (Congress) तिकीट देण्यात आले होते. काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र,मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, भाजपच्या नियोजनाला यश आलं आहे.

अकोला बुलडाणा वाशिमध्ये चुरशीची लढत?

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. यामध्ये भाजपचे वंसत खंडेलवाल विजयी झाले. गोपिकिशन बाजोरिया गेल्या तीन टर्मपासून आमदार होते. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी धक्का मानला जातोय.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघातील पक्षीय बलाबल

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे काँग्रेस 190, शिवसेना तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 76 असे एकूण 396 मते आहेत तर 130 तर भाजपाकडे 244 मते आहेत.  या स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीचे 85 तर अपक्ष 171 असे एकूण 256 मतदार होते. महाविकास आघाडीची एकूण 396 मतं होती. मात्र, गोपिकिशन बाजोरिया यांना 331 मतं मिळाली आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मतं फुटल्याचं समोर आलं आहे.

इतर बातम्या:

Maharashtra News Omicron LIVE Update | विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला बुलडाणा वाशिम मतदारासंघाचा आज निकाल, कोण बाजी मारणार?

मनसेची मराठवाड्यात पहिलीच मोठी बैठक, 1500 पदाधिकारी येणार, राज ठाकरेंना काय खुणावतंय औरंगाबादेत?

Maharashtra MLC election Result 2021 counting live updates Nagpur Akola Washim Buladana constituency voting today BJP Shivsena Congress Chandrashekhar Bawankule Mangesh Deshmukh Chhotu Bhoyar Gopikishan Bajoria Vasant Khandelwal contest seats

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Dec 2021 01:05 PM (IST)

    परमबीर सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय

    केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंह यांना वाचवत आहेत. भाजपशी परमबीर सिंह यांचं संगनमत झालं आहे. त्यांना फार काळ वाचवलं जाऊ शकत नाही. चार्जशीटमध्ये एक मास्टरमाईंड कोण आहे. परमबीर सिंगच्या घरी वाझेची मिटींग झाली होती. इनोव्हा गाडीचा उल्लेख आहे. यंत्रणा परमबीर सिंह यांना वाचवत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला,

  • 14 Dec 2021 12:40 PM (IST)

    Nagpur MLC Result : महाराष्ट्र विधान परिषद नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांना एकूण ५५४ मतापैकी पाहिल्या पसंतीचे 362 मते मिळाली. ५ मते अवैध ठरली. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे ही मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निरिक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी प्रक्रीया पूर्ण झाली.

    नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात होते. १० डिसेंबरला जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. एकूण 560 मतदारांपैकी 554 म्हणजेच 98.92 टक्के मतदारांनी आपला मताधिकार बजावला होता.

    बचत भवन येथे आज सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये स्ट्राँग रूम उघडण्यात आली. मतपत्रिकांची सरमिसळ, गठ्ठे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार टेबलवर मतमोजणी करण्यात आली. यामध्ये 554 पैकी 549 मते वैध, तर 5 मते अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली. विजयासाठी एकूण वैध मतांपैकी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्याच फेरीत विजयासाठी निश्चित मते प्राप्त केल्याने श्री. बावनकुळे यांना विजयी घोषित करण्यात आले निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी श्री. बावनकुळे यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले .

  • 14 Dec 2021 11:56 AM (IST)

    भाजप ने घोडेबाजार करून हा विजय मिळविला: नाना पटोले

    भाजप ने घोडेबाजार करून हा विजय मिळविला: नाना पटोले

    घोडेबाजार होणे हे लोकशाही साठी घातक आहे

    स्वतःचे मतदार त्यांनी बाहेर नेलं , त्यांचा आपल्या मतदारांवर विस्वास नव्हता

    निकाल आला त्याचा स्वागतच करायला पाहिजे

    बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले त्यावर उत्तर नंतर आम्ही देऊ आता बोलणे योग्य वाटणार नाही

    उमेदवार बदलणे ही आमची स्टेटजी होती त्याचा काहीही परिणाम झाला नाही

    अकोला बद्दल मला माहिती नाही

  • 14 Dec 2021 11:23 AM (IST)

    आजचा विजय चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवलेल्या श्रद्धा आणि सबुरीचं फळ: चंद्रकांत पाटील

    नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकानं विजयी झाले. भाजपची मत एकत्र ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो. महाविकास आघाडीची मत मिळवण्यात बावनकुळे यशस्वी झाले. अकोल्याचा विजय अद्वितीय आहे. वसंत खंडेलवाल यांनी तीन वेळचे आमदार गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवलेल्या श्रद्धा आणि सबुरीचं फळ आहे. नागपूरमध्ये काँग्रेसनं पोरखेळ केला. चिन्हावरचा उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत पडलं आहे. त्यांनी अपक्ष म्हणून पाठिंबा झालेला उमदेवार पराभूत झाला. राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेली जागा बिनविरोध केला. काँग्रेसनं धुळे मुंबईवर आमची बोळवण केली.

  • 14 Dec 2021 11:14 AM (IST)

    हा निर्णायक विजय असून महाविकास आघाडीला चपराक, भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात: देवेंद्र फडणवीस

    आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. मी स्वत: निवडून आलो तेव्हा झालेल्या आनंदापेक्षा मोठा आनंद झाला आहे. महाविकास आघाडीला ही चपराक आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी एकत्र आल्यावर सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो, हे मांडलेले गणित चुकीचं आहे, हे या निकालामुळं स्पष्ट झालं आहे. बावनकुळे यांचा विजय ही भविष्यातील यशाची नांदी आहे.  नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, नितीन गडकरी यांचं आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा निर्णायक विजय असून भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 14 Dec 2021 10:55 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसंत खंडेलवाल यांचे अभिनंदन

  • 14 Dec 2021 10:27 AM (IST)

    Akola MLC Election Result : अकोल्यात भाजपनं करुन दाखवलं

    सलग तीन वेळा अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघाचे विधान परिषदेच प्रतिनिधीत्व करणारे आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना अखेर मात देवून भाजपाचे वसंत खंडेलवाल विजयी झाले असून यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत.

    अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.

  • 14 Dec 2021 10:22 AM (IST)

    Akola Election Result 2021: अकोल्यात 31 मतं बाद

    एकूण झालेलं मतदान-808

    गोपीचंद बाजुरीया-334

    वसंत खंडेलवाल-443

    एकून मतदान -777

    बाद-31

    भाजप चे वसंत खडलेवाल यांचा 109 मतांनी विजयी झालेत…

  • 14 Dec 2021 10:20 AM (IST)

    Nagpur MLC Election Result : चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186  मते प्राप्त झाली.

  • 14 Dec 2021 09:03 AM (IST)

    Nagpur MLC Election Result : नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

    नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

  • 14 Dec 2021 08:54 AM (IST)

    Akola Election Result 2021: अकोल्याचं चित्र 10 वाजेपर्यंत स्पष्ट होणार

    अकोल्यात मतमोजणी सुरू असून मतमोजणी कक्षात कॅमेरामन आणि प्रतिनिधी ला नो एंट्री…सुरवात व्हिडीओ घेऊ दिल्या नंतर प्रवेश बंद केला आहे…. अकोल्यात 10 वाजेपर्यंत निकाल होऊ शकतो घोषि

  • 14 Dec 2021 08:52 AM (IST)

    Nagpur MLC Election Result : नागपूर विधानपरिषद निवडणूक मतमोजणी सुरु; भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर

    – नागपूर विधानपरिषद निवडणूक मतमोजणी सुरु

    – भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर

  • 14 Dec 2021 08:39 AM (IST)

    Nagpur MLC Election Result : नागपूरमध्ये मतपत्रिकांचे 25-25 चे गठ्ठे तयार, 50 मिनिटात चित्र स्पष्ट होणार

    नागपूरमध्ये मतपत्रिकांचे 25-25 चे गठ्ठे तयार झालेय. 50  मिनिटांत चित्र स्पष्ट होईल

  • 14 Dec 2021 08:10 AM (IST)

    Akola Election Result 2021: अकोला- बुलढाणा -वाशिम येथील विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

    अकोला- बुलढाणा -वाशिम येथील विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू…

    पाच टेबल वर होणार मतमोजणी….

  • 14 Dec 2021 07:49 AM (IST)

    Nagpur MLC Election Result : नागपूर विधानपरिषद निवडणूक मतमोजणीला आठ वाजता होणार सुरुवात

    नागपूर विधानपरिषद निवडणूक मतमोजणीला आठ वाजता होणार सुरुवात

    – नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनमध्ये मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

    – 11 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल.

    – चार टेबलवर मतमोजणीची तयारी, परिसरात चोख पोलीस बंदोबस्त

    – निवडणूकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख मैदानात

    – सुरुवातीला 25 – 25 मतांचे गठ्ठे तयार केले जाणार

    – एका टेबलवर तीन अधिकारी करणार

    – एकूण 554 मतदारांनी केलं मतदान, विजयाचा कोटा 278 पूर्ण करणारा उमेदवार होणार विजयी

Published On - Dec 14,2021 6:56 AM

Follow us
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.