Maharashtra News : एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईला सुरूवात-सूत्र

Maharashtra MLC Election Result 2021: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News : एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईला सुरूवात-सूत्र
Breaking

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 15, 2021 | 6:12 AM

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra MLC Election Result 2021) नागपूर  (Nagpur)आणि अकोला  वाशिम बुलडाणा (Akola Washim Buldana) या जागांवरील  मतमोजणी आज होणार आहे. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) तर अकोला वाशिम बुलडाणा मध्ये गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron)  वेरियंटचे रु्ग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी राज्यातील 6 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 20 वर पोहोचली आहे.   तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे. नाशिकमध्ये आज शाळा सुरु होत आहे. तर, पंतप्रधान  नरेंद्र मोदी आजही (Narendra Modi ) उत्तर प्रदेशच्या दौैऱ्यावर जाणार आहेत.  महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 14 Dec 2021 06:00 PM (IST)

  एसटी संपावरून अनिल परब अॅक्शन मोडवर

  संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर (St Employees Strike) कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. निलंबित केलेल्या 10 हजार कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस देणार आहे. सेवेतून बडतर्फ का करू नये? यासाठी ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटीशीनंतर संपावरील कर्मचाऱ्यांना 8 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. 20 तारखेला कोर्टाची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल,  तोपर्यंत कामावर या, असं आवाहनही परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी पुन्हा एकदा केले आहे.

 • 14 Dec 2021 05:59 PM (IST)

  ओबीसी समाजाचा 17 डिसेंबरपासून चक्काजाम आंदोलनाचा इशारा

  ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आता ओबीसी समाजाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या विविध मागण्यासांठी ओबीसी समाज 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करणार आहे. अशी घोषणा ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे.

 • 14 Dec 2021 01:59 PM (IST)

  पेपर पहिल्यांदा फुटले नाहीत: राज ठाकरे

  लॉकडाऊनच्या काळात हात फॅक्चर झाला होता. त्यानंतर पायाचं एक ऑपरेशन झालं , सध्या फिजीओ सुरु आहे. गाडीतून उतरणं आणि पुन्हा चढणं याचा त्रासा होतो. त्यामुळं नाशिकहून निघताना अगोदर कळवलं होतं.  औषध घेतली होती त्यामुळं ग्लानी होती, असं राज ठाकरे म्हणाले.

  पेपर पहिल्यांदा फुटला नाही.  यापूर्वी पेपर फुटले. मात्र, पेपर फोडणारे फुटले नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. सरकार म्हणून जो वचक असायला हवा तो वचक नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

 • 14 Dec 2021 01:09 PM (IST)

  12 आमदारांचे निलंबन प्रकरणी पुढील सुनावणी होणार 11 जानेवारीला होणार

  नवी दिल्ली 12 आमदारांचे निलंबन प्रकरण

  पुढील सुनावणी होणार 11 जानेवारीला होणार

  कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली,

  विधिमंडळाला सूचना करणे योग्य नाही

 • 14 Dec 2021 01:06 PM (IST)

  राजधानीमध्ये ओमीक्रॉंनचे चार नवे रुग्ण

  राजधानीमध्ये ओमीक्रॉंनचे चार नवे रुग्ण

  परदेशातून आलेले चार नवे रुग्ण सापडल्याची माहिती

  नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची माहिती

 • 14 Dec 2021 01:01 PM (IST)

  आमचा आवाज देशापर्यंत पोहोचवा: संजय राऊत

  आपण देशाच्या लोकशाहीचे स्तंभ आहात. तुमच्या माध्यमातून आमचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज देशातील लोकांपर्यंत पोहोचवा, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. जोपर्यंत सरकार आमचा आवाज ऐकत नाही तोपर्यंत आवाज पोहोचवत राहा, असं संजय राऊत म्हणाले. राज्य सभेच्या 12 खासदारांच्या निलंबनावरुन विरोधकआक्रमक झाले आहेत.

 • 14 Dec 2021 12:38 PM (IST)

  महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावरील शाई फेकीचे कोल्हापुरात पडसाद

  महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावरील शाई फेकीचे कोल्हापुरात पडसाद

  घटनेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक

  शिवसेनेच्या वतीने बिंदू चौकात कर्नाटक सरकार विरोधात केली जाणार निदर्शनं

  कर्नाटक सरकारचा ध्वज जाण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न

  काल बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी त्यांच्यावर केली होती शाही फेक

 • 14 Dec 2021 11:52 AM (IST)

  शिखर शिंगणापूर येथील घाटात 500 फूट खोल दरीत गेली कार, दोघे जागीच ठार

  सातारा: शिखर शिंगणापूर येथील घाटात 500 फूट खोल दरीत गेली कार....

  कारमधील महिला व पुरुष जागीच ठार....

  शिखर शिंगणापूर येथील स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर....

  शिखर शिंगणापूर हुन नातेपुतेकडे जाताना कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात...

  माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरचा घाटातील घटना

 • 14 Dec 2021 09:31 AM (IST)

  बेळगावातील घटना गंभीरपणे घ्यावी: संजय राऊत

  या देशामधल्या बहुसंख्य हिंदूच्या भावना डावलून कोणाला राजकीय पाऊल पुढं टाकता येणार नाही, अशी चर्चा राहुल गांधी यांच्याशी झाली होती. जयपूरच्या रॅलीत राहुल गांधी यांनी हिंदूचं राज्य आणायच असल्याचं मह्टलं आहे.  महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मदनमोहन मालवीय हे काँग्रेसमध्ये होते. बेळगावात ल्या घटनेची महाराष्ट्र सरकारनं गंभीर दखल घ्यावी, असं संजय राऊत म्हणाले.

 • 14 Dec 2021 08:46 AM (IST)

  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांना काळे फासल्याच्या निषेधार्थ आज बेळगाव बंदची हाक

  आज बेळगाव बंदची हाक लोकशाही मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपल्या मागणीसाठी आंदोलन चढत असताना मनपाच्या अधिकार्‍यांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांना काळे फासण्यात आले त्याच्या निषेधार्थ आज बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे . मराठी भाषकांना आपले व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आला आहे.

 • 14 Dec 2021 07:31 AM (IST)

  नाशिक मनपाच्या आयटी हब साठी खाजगी भूखंडाची जमवाजमव

  नाशिक - मनपाच्या आयटी हब साठी खाजगी भूखंडाची जमवाजमव

  खाजगी जमीन मालकांकडून महापालिकेने मागवले प्रस्ताव

  लवकरच आयटी उद्योगांची परिषद घेणार असल्याची महापौरांची माहिती

  आयटी हब च्या क्षेत्र विस्तारणीसाठी खाजगी जमीन मालकांना साकडं

  महापालिकेच्या संकेतस्थळावर माहिती देण्याचे आवाहन

  आयटी हब साठी 10 कोटींचा निधी महासभेत मंजूर

 • 14 Dec 2021 07:25 AM (IST)

  कर्नाटकातील सौंदत्ती इथली यल्लमा यात्रा रद्द

  कर्नाटकातील सौंदत्ती इथली यल्लमा यात्रा रद्द

  पुढील सहा दिवस मंदिर बंद राहणार

  19 आणि 20 डिसेंबरला होणार होते सौंदत्ती यल्लमा यात्रा

  कोरोना आणि ओमीक्रॉंन च्या पार्श्वभूमीवर यल्लमा देवस्थान समितीचा निर्णय

  मंदिर परिसरात सर्व बाजूने केली जाणार आहेत नाकेबंदी

  सौंदत्ती यल्लमा यात्रेसाठी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून जातात लाखो भाविक

  सलग दुसऱ्या वर्षी सौंदत्ती यल्लमा यात्रा रद्द

 • 14 Dec 2021 07:20 AM (IST)

  नागपुरात अपहरण आणि बलात्काराच्या खोट्या तक्रारीमुळं पोलिसांची भागमभाग

  नागपुरात अपहरण आणि बलात्काराच्या खोट्या तक्रारीमुळं पोलिसांची भागमभाग,

  गाण्याच्या क्लास ला जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनं काल सायंकाळी उडाली होती खळबळ,

  रामदासपेठ भागातून दोघांनी अपहरण करून कळमना भागात सामूहिक बलात्कार केल्याची दिली होती तक्रार,

  घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सर्व पोलीस यंत्रणा लागली होती कामाला,

  250 cctv फुटेज तपासल्यावर तरुणी खोटं बोलत असल्याचा पोलिसांना आला संशय,

  तरुणीला विश्वासात घेतल्यावर तरुणीनं दिली माहिती,

  प्रेमप्रकरणातून आणि व्यक्तिगत कारणामुळे केला अपहरण आणि बलात्काराचा बनाव,

  तरुणीवर होणार कारवाई

Published On - Dec 14,2021 6:27 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें