AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AMC Election 2022, Ward 30 : भाजपचा सत्तेत ‘पुन्हा येईन’चा नारा, पण विरोधकांचीही गाडी जोरात

प्रभागांचे बदललेले स्वरूप तसेच राज्यातील उलथापालथ यामुळे भाजपला आपला 'पुन्हा येईन'चा नारा यशस्वी होईल, याचा पूर्ण आत्मविश्वास आहे. पण त्यांचा हा आत्मविश्वास किती सहज पूर्णत्वास जातोय कि विरोधकांच्या रणनीतीपुढे तो अडखळतोय, हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे.

AMC Election 2022, Ward 30 : भाजपचा सत्तेत 'पुन्हा येईन'चा नारा, पण विरोधकांचीही गाडी जोरात
अकोला महापालिका निवडणूक
| Updated on: Aug 21, 2022 | 12:28 PM
Share

अकोला : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा विजय मिळवून देण्याची तयारी आतापासूनच सुरु करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी त्याच दृष्टिकोनातून यंदा होत असलेल्या महापालिका निवडणुकां (Municipal Elections)कडे पाहत आहेत. देशात पुन्हा एकदा भाजप (BJP)चा बोलबाला दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल आणि केंद्रातील मोदी सरकारचा दबदबा या जोरावर भाजपचा महापालिका निवडणुकांतील उत्साह द्विगुणित झाल्याचे चित्र आहे. सध्या अकोला जिल्ह्यातही भाजप आपली ताकद वाढवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीतही भाजप पुन्हा विजयश्री आपल्याच ताब्यात ठेवेल, असे दिसत आहे. याचवेळी तीन वर्षांपूर्वी राज्यात आकार घेतलेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)नेही महापालिका निवडणुकांमध्ये जोर लावला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी निर्माण केलेल्या महाविकास आघाडीने पालिका निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. हे पक्ष स्वबळावरच रिंगणात उतरणार आहेत. मात्र त्यांचा भाजपविरोधी एक सूर असल्यामुळे अकोला महापालिका निवडणुकीत भाजपच्या बहुमतावर परिणाम होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 30 मधील सद्यस्थितीचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.

अकोला महापालिका वॉर्ड 30 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 30 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 24259 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 5077 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 974

प्रभाग क्रमांक 30 मधील प्रमुख विभाग

अकोला महापालिकेचे नवीन 10 प्रभाग वाढले आहेत. प्रभाग संख्येत ही वाढ होताना सर्व प्रभागांचे भौगोलीक स्वरूप बदलले आहे. त्यानुसार महापालिकेचा सर्वात शेवटचा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये शिवापूर, खडकी, मलकापूर गावठाण, कोठारी वाटिका, सन सिटी, दिपाली ले-आऊट, संजीवनगर, शिक्षक कॉलनी, संतोषनगर अशा विविध प्रमुख विभागांचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रभाग आकार आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे. त्यामुळे येथील निवडणूक चार सदस्यीय असणार आहे. पालिकेचे पूर्वी 20 प्रभाग होते. ते आता 30 झाले आहेत. सुरुवातीच्या 29 प्रभागांमध्ये तीन सदस्यीय निवडणूक होणार आहे. सर्व प्रभागांमधून 91 नगरसेवक निवडून पालिकेवर जाणार आहेत.

अकोला महापालिका वॉर्ड 30 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

पालिका निवडणुकीतील आरक्षणाचे स्वरूप कसे असेल?

पालिकेच्या एकूण 91 पैकी 46 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असणार आहेत. अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या 15 पैकी 8 जागांवर निवडणूक लढवण्यास महिला उमेदवारांना संधी मिळाली आहे. तसेच अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 2 पैकी 1 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहे.

अकोला महापालिका वॉर्ड 30 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षीय बलाबल

भारतीय जनता पक्ष – 48 राष्ट्रीय काँग्रेस (INC) – 13 शिवसेना (SS) – 08 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) – 05 भारिप बहुजन महासंघ (BBM) – 03 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) – 01 अपक्ष/इतर – 02

प्रभागांचे बदललेले स्वरूप तसेच राज्यातील उलथापालथ यामुळे भाजपला आपला ‘पुन्हा येईन’चा नारा यशस्वी होईल, याचा पूर्ण आत्मविश्वास आहे. पण त्यांचा हा आत्मविश्वास किती सहज पूर्णत्वास जातोय कि विरोधकांच्या रणनीतीपुढे तो अडखळतोय, हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.