Nagar Panchayat Election result 2022 : केंद्रीय मंत्र्यांसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, विजयाचा गुलाल कुणाला मिळणार?

Nagar Panchayat Election result 2022 : नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्यातील मंत्री आणि आमदारांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Nagar Panchayat Election result 2022 : केंद्रीय मंत्र्यांसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, विजयाचा गुलाल कुणाला मिळणार?
भारती पवार, एकनाथ खडसे, अनिल परब, नाना पटोले
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 9:56 AM

मुंबई: महाराष्ट्रातील 106 नगरपंचायंती (Nagar Panchayat Election Result), भंडारा आणि गोंदियातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, यासह सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक आणि शिरोळ, नागभीड , जत , सिल्लोड , फुलंब्री , वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागा यासह ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) रद्द झाल्यानं राज्यातील राजकीय पक्ष आक्रमक झाले होते. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्यातील मंत्री आणि आमदारांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार, कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराज देसाई, सेना नेते रामदास कदम, जळगावात एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे, रोहित पवार, माजी मंत्री राम शिंदे, खासदार प्रफुल पटेल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

जळगावात एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जळगावातील बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानं ही निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती.

केंद्रीय मंत्री भारती पवार यांची प्रतिष्ठा पणाला

नाशिकच्या दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची लढत होत आहे.

अनिल परब आणि रामदास कदम दापोली मंडणगडमध्ये कुणाचं वर्चस्व

रत्नागिरीमध्ये दापोली मंडणगडमध्ये शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवडणुकीची सूत्र हाताळली. इथं राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती होती. मात्र, शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

साताऱ्यात शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस

सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायतीमध्ये शिवसेना नेते गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या पॅनेलमध्ये निवडणूक होतं आहे. तर दुसरीकडे कोरेगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये लढत होत आहे. शशिकांत शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

रोहित पवार की राम शिंदे कर्जत कुणाकडे?

अहमदगरमध्ये कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. निवडणूक प्रचारात दोन्ही नेत्यांनी जोर लावला होता. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले.

देहूगावमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला

पुण्यातील देहूमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपच्या बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. या देहू नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडली असून यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.

भंडारा जिल्ह्यात काँग्रेस की राष्ट्रवादी

भंडारामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भाजप या ठिकाणी किती यश मिळवणार हे पाहावं लागेल.

तासगावात रोहित पाटील यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर .पाटील यांचा मुलगा रोहित पाटील सांगलीतील कवठेमहाकाळ  नगरपंचायतीसाठी उभे राहिले आहेत. रोहित पाटील यांच्या विरोधात इतर राजकीय पक्षांचं आव्हान आहे.

इतर बातम्या:

Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी, बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Nagar Panchayat Election 2022 : नगर पंचायत, झेडपी, ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाला गुलाल, कुणाच्या पदरी निराशा? निकालाची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठी डिजिटलवर

Maharashtra Nagar Panchayat Election Result Bharati Pawar Dada Bhuse Anil Parab Eknath Khadse Girish Mahajan Nana Patole Praful Patel bid day for these leaders

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.