Nagar Panchayat Election 2022 : नगर पंचायत, झेडपी, ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाला गुलाल, कुणाच्या पदरी निराशा? निकालाची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठी डिजिटलवर

Nagar Panchayat Election 2022 : नगर पंचायत, झेडपी, ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाला गुलाल, कुणाच्या पदरी निराशा? निकालाची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठी डिजिटलवर
मतमोजणी (फाईल फोटो)

या निवडणुकीचा निकाल (Election Result) उद्याच लागणार असून, कुणाला गुलाल लागणार आणि कुणाच्या पदरी निराशा येणार हे उद्या सकाळी 10 वाजल्यापासून स्पष्ट होणार आहे. या निवडणूक निकालाची प्रत्येक आणि क्षणक्षणाची अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 19, 2022 | 10:32 AM

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यातील 93 नगर पंचायतीमधील (Nagar Panchayat Election) 336 जागांसाठी आज मतदान पार पडलं. त्याचबरोबर भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 जागा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या 45 जागा आणि 195 ग्रामपंचायतींसाठीही (Gram Panchayat) आज मतदान झालं. आता लक्ष लागून आहे ते या निवडणूक निकालांकडे. या निवडणुकीचा निकाल (Election Result) उद्याच लागणार असून, कुणाला गुलाल लागणार आणि कुणाच्या पदरी निराशा येणार हे उद्या सकाळी 10 वाजल्यापासून स्पष्ट होणार आहे. या निवडणूक निकालाची प्रत्येक आणि क्षणक्षणाची अपडेट तुम्हाला टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. या निवडणुकांमधून त्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील विजयाची पायाभरणी होत असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, नगर पंचायत, महापालिका निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि नेते कंबर कसून कामाला लागतात. हेच चित्र आज पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. 93 नगर पंचायतीमधील 336 जागा, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 जागा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या 45 जागा आणि 195 ग्रामपंचायतींसाठीही आज मतदान झालं. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष उद्याच्या निकालाकडे लागलं आहे.

नगरपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान

93 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी आज सरासरी 81 तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अदाज आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10; तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठीदेखील आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 73 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 76 टक्के मतदान झाले. सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीसुद्धा प्राथमिक अंदाजानुसार 50 टक्के मतदान झाले आहे.

निवडणूक प्रक्रियेत आयोगाकडून बदल

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले.

राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी आज मतदान झाले.

इतर बातम्या :

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड गप्प का? मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती? चित्रा वाघ यांचा सवाल

गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीवरुन चंद्रकांतदादांनी राऊतांना फटकारलं, 2017 च्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारीच सांगितली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें