AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांचे सूचक ट्वीट

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले (Sanjay Raut Tweet) आहे. त्यांच्या या ट्विटनंतर शिवसेना युतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या (Sanjay Raut Tweet) आहेत.

पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांचे सूचक ट्वीट
| Updated on: Nov 11, 2019 | 8:34 AM
Share

मुंबई : भाजपने सत्तास्थापनेसाठी नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण (Sanjay Raut Tweet) दिले आहे. सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची रात्रभर खलबंत सुरु आहेत. यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केले (Sanjay Raut Tweet) आहे. त्यांच्या या ट्विटनंतर शिवसेना युतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या (Sanjay Raut Tweet) आहेत.

‘रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी………!’ असा प्रकारचे ट्वीट संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पोस्ट केलं आहे. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान दुपारी 3 वाजता संजय राऊत दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळी 6 वाजता सोनिया गांधी आणि संजय राऊत यांची ही भेट होणार आहे.

तत्पूर्वी येत्या काही तासात संजय राऊत मुंबईत एक पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले (Sanjay Raut Tweet) आहे.

यासोबत खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘लोकसभा निवडणुकीआधी जागावाटप आणि सत्तावाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारुन शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी 11 वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे.’ असं अरविंद सावंत यांनी लिहिलं आहे.

दरम्यान काल रात्री मातोश्रीवर चार तास शिवसेना नेत्यांची बैठक चालली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्यात ही बैठक झाली. मात्र या सभेनंतर कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही.

संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्या या ट्विटनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार, हेही जवळपास निश्चित झालं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची वाटचाल ‘महासेनाआघाडी’ अर्थात शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस अशा आघाडीकडे होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास…

पर्याय 1

शिवसेना- अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + काँग्रेस (44) + राष्ट्रवादी (54) = 162 बविआ (3) + समाजवादी पक्ष (02) + स्वाभिमानी (01) = 162+06 = 168 बहुमताचे संख्याबळ – 145

पर्याय 2

राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि काँग्रेस तटस्थ राहिली तर सभागृहाचे संख्याबळ 288 वजा 44 = 244 शिवसेना – अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + राष्ट्रवादी (54)+ काँग्रेस समर्थक अपक्ष (04)  =  122 बहुमताचे संख्याबळ – 123

काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचं सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादी खेळू शकते, अशी चर्चा आहे.

संबंधित बातम्या : 

BREAKING | शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण, ‘मातोश्री’वर रात्रभर खलबतं

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचं शिवसेनेला निमंत्रण

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.