सत्तास्थापनेच्या गदारोळावर सोशल मीडियावर फनी पोस्टचा धुमाकूळ

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (funny post on maharashtra politics) यांच्या बंडखोरीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे.

सत्तास्थापनेच्या गदारोळावर सोशल मीडियावर फनी पोस्टचा धुमाकूळ

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (funny post on maharashtra politics) यांच्या बंडखोरीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अजित पवारांसह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तसेच सोशल मीडियावर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर मोठ्या प्रमाणात जोक्स (funny post on maharashtra politics) व्हायरल होत आहेत.

फेसबूक, ट्विटरसह इतर सर्व सोशल मीडियावर सकाळपासून अनेक मेसेज आणि मीम्स व्हायरल झाले आहेत. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे उल्लेख आहेत. तर काही मेसेज हे शिवसेनेवर आधारित आहेत.

आजचा पेपर उद्या रद्दी होतो हे ऐकलं होतं, पण आजचा पेपर आजच रद्दी झालेला आज पाहीला

आजचा पेपर सकाळीच जुना झाला ????

तुम्हाला जर एकत्र यायचं होत तर मला कशाला पाडल

उदयन राजे ???

सिंचन घोटाळ्याची चौकशी करणारा राज्याचा मुख्यमंत्री व सिंचन घोटाळा करणारा उपमुख्यमंत्री झाला…!! हे सगळं लोकहितासाठी चाललंय..????‍♂

मला तर आता साताऱ्यातील सभेत पडलेल्या पावसावर सुध्दा विश्वास राहीला नाही?

पाणी उकळून प्या रे

दादा उपमुख्यमंत्री झाले ?

शेवटचा पर्याय .. आदित्य ठाकरेने , होणाऱ्या मुलाचे नाव मुख्यमंत्री ठेवावे (होईल तेव्हा)

म्हणजे मुख्यमंत्री हा कायम शिवसेनेचा असेल आणि त्याला सगळे हाक मारतील…“मुख्यमंत्री आदित्य ठाकरे”

शासन पांडवांचे आले काय किंवा कौरवांचे आले,जनता बिचारी द्रोपदीसारखी असते.

कौरव शासनकर्ते असले तर वस्त्रहरण करतील  आणि पांडव असले तर जुगारात हरतील !

Published On - 1:30 pm, Sat, 23 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI