संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त भेट, प्रविण दरेकर, शेलारांसह चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

राज्यातील गुप्त भेटीचा आता शिवसेना-भाजपपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त भेट, प्रविण दरेकर, शेलारांसह चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
प्रविण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 6:35 PM

मुंबई : राज्यातील गुप्त भेटीचा आता शिवसेना-भाजपपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात दोन्ही नेत्यांच्या गाड्या कैद झाल्या आहेत.  मात्र, भाजप नेते प्रविण दरेकर यांनी गुप्त भेटींच्या बातम्या काही दिवसांपासून पाहतोय. गुप्त भेटींमध्ये संजय राऊत हे कॉमन आहेत. आशिष शेलार आणि संजय राऊत यांची भेट झालीय, असं म्हटलं जातेय पण ते नाकारत असतील तर त्यावर बोलणं संयुक्तिक नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.  तर, भेट झाली असेल तर लपवायची गरज नाही, असं आशिष शेलार म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी अशा भेटी होत राहतात, असं म्हटलं.  (Maharashtra Politics Shivsena MP Sanjay Raut and BJP leader Ashish Shelar meet at Mumbai reactions of Pravin Darekar, Ashish Shelar and Chandrakant Patil)

संजय राऊत आणि आशिष शेलार यांची भेट ही कोणत्या कारणासाठी झाली हे माहिती नाही. दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मातोश्री येथे वर्षावर मुख्यमंत्र्याशी भेट झाली. त्यानंतर शरद पवार यांच्याशी भेट झाली. या भेटी गंभीर आहेत का?  हे सांगू शकत नाही. संजय राऊत हे आशिष शेलार यांना का भेटले हे दोन्ही नेतेच सांगू शकतील, असं प्रविण दरेकर म्हणाले.

माझी कधीच कोणाशी भेट झालेली नाही. भेट झाली असेल तर लपवायची गरज नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.  महाराष्ट्रातील ही संस्कृती आहे, त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते भेटत असतात. भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नाही. संजय राऊत आणि आशिष शेलार हे चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते भेटले असतील. भाजप आणि शिवसेना एकत्र येणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भेटींचं वाढतं सत्र

महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या भेटी गेल्या काही महिन्यात वाढल्या आहेत. अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदाबादमध्ये झालेली गुप्त भेट, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिगत भेट त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणा उलथापालथ होणार का? याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत.

संबंधित बातम्या:

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.