AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेतील बॅनरबाजी भाजप आमदारांना भोवण्याची चिन्हं, निलंबनाची शक्यता

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात बॅनरबाजी करणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाणार (Maharashtra winter session) आहे.

विधानसभेतील बॅनरबाजी भाजप आमदारांना भोवण्याची चिन्हं, निलंबनाची शक्यता
| Updated on: Dec 17, 2019 | 10:03 AM
Share

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात बॅनरबाजी करणाऱ्या भाजप आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाणार (Maharashtra winter session) आहे. सभागृहात बॅनरबाजी करणाऱ्या भाजप आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालावे यासाठी हे कडक पाऊल उचललं जाण्याची शक्यता वर्तवली जात (Maharashtra winter session) आहे.

नागपूर येथे कालपासून (16 डिसेंबर) सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या मुद्द्यांवरुन चांगलचं गाजलं. विधानसभेत काल सावरकर प्रकरणावरुन विरोधकांनी चांगला गदारोळ केला. यावेळी विरोधकारांनी सावरकर प्रकरणावरुन घोषणाबाजी केली. तसेच काही आमदारांनी सभागृहात बॅनरबाजी केली.

सभागृहात बॅनर चालणार नाही असं अध्यक्षांनी यापूर्वीच सांगितले होते. मात्र तरीही काही आमदारांनी काल विधानसभेच्या सभागृहात बॅनर झळकवले. त्यामुळे बॅनरबाजी करणाऱ्या आमदारांविरोधात निलंबनाची कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालावे यासाठी हे कडक पाऊल उचलले जाणार असल्याचेही बोललं जात (Maharashtra winter session) आहे.

दरम्यान काल विधीमंडळ सभागृहात सावरकर प्रकरणी झालेल्या गदारोळानंतर कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरु होणार आहे.

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस 

हिवाळी अधिवेशनचा आजचा (17 डिसेंबर) दुसरा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादळी ठरणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत आणि कर्जमाफीची मागणी विरोधक लावून धरणार आहे.

दरम्यान हिवाळी अधिवेशनाचा रणनितीबाबत महाविकासआघाडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला महाविकासआघाडीचे नेते आणि तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित राहणार आहे. शिवसेना पक्ष कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी ही बैठक होणार आहे.  शेतकरी मदत, कर्जमाफी या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा केली जाणार (Maharashtra winter session) आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारला घेरण्याची रणनिती ठरवण्याची बैठक विरोध पक्षानेही बैठक आयोजित केली आहे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. भाजपच्या विधीमंडळ कार्यालयात होणार ही बैठक आयोजित केली आहे.

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.