तीन मुख्यमंत्री… तीन बंड… दोन उपमुख्यमंत्री… महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारी ती पाच वर्ष!
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीला सामोरे जातील. कुणाच्या हातात सत्ता येईल तर कुणाला विरोधी पक्षात बसावं लागेल. 23 नोव्हेंबर 2024 रोजी राज्याचं चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे राज्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण गेल्या पाच वर्षात राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. या पाच वर्षात तीन बंड झाले. त्यातील दोन बंड सर्वात मोठे होते. या पाच वर्षात राज्याने तीन मुख्यमंत्री पाहिले. पहिल्यांदाच राज्यात दोन उपमुख्यमंत्रीही झाले. या पाच वर्षात काय काय घडलं?

महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजलं. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अवघ्या महिन्याभरात महाराष्ट्रात नवं सरकार येणार आहे. त्यामुळे कुणाची सत्ता येईल हे मतमोजणीच्या दिवशीच कळणार आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी आहे. मात्र, राज्याचं मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे आहे. 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्व काही बदललं आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळालं होतं. पण युती तुटली. ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण त्यापूर्वी निकाल लागल्यावर काही दिवसातच अजित...