महाविकासआघाडीत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न, नेत्यांचे आमदारांना मार्गदर्शन

महाविकासआघाडीत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न, नेत्यांचे आमदारांना मार्गदर्शन

महाविकासआघाडीचे नेते आणि तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित (Mahavikas aaghadi meeting) होते. बैठकीत शेतकरी मदत, कर्जमाफी या मुद्द्यावर यावर चर्चा झाली.

Namrata Patil

|

Dec 17, 2019 | 1:30 PM

नागपूर : “जे नवीन सदस्य आले आहे. ते त्यांना वाटेल तेव्हा वेलमध्ये येतात. विरोधी पक्षांनी ही सुरुवात दोन-तीन अधिवेशनानंतर करायची असते.” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यावेळी म्हणाले. “राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडे कधीही पाहिले (Mahavikas aaghadi meeting) नव्हते. पण आज मात्र महाराष्ट्रात राजकारण करत आहेत.” असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन रणनितीबाबत महाविकासआघाडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महाविकासआघाडीचे नेते आणि तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित (Mahavikas aaghadi meeting) होते. बैठकीत शेतकरी मदत, कर्जमाफी या मुद्द्यावर यावर चर्चा झाली.

“भाजपचे आमदार आपल्याला अडचणीत आणायचे प्रयत्न करत आहेत. त्याला आपण नीट हाताळू शकतो. ते नीट वागतील अशी अपेक्षा होती. पण ते पहिल्या दिवसांपासून आक्रमक झालेत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहिले पाहिजे. त्यांना उत्तर दिलं पाहिजे. असं मत काँग्रेस नेते अशोक चव्हणा यांनी सांगितले. जाम मिलिया पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत, प्रश्न चिघळला आहे. लोकांचा आवाज दाबला जातो आहे. मतभेद होतील. पण त्या नेत्यांनी बसून चर्चा केली पाहिजे. आमदारांना गाईड केले पाहिजे. आपल्याला पुढे जायचे आहे,” असेही अशोक चव्हाण म्हणाले.

“जे नवीन सदस्य आले आहे. ते त्यांना वाटेल तेव्हा वेलमध्ये येतात. विरोधी पक्षांनी ही सुरुवात दोन-तीन अधिवेशनानंतर करायची असते. असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. आपण कॉमन मिनिमम प्रोगाम केला. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना मदत वाटप सुरु आहे. आपण साडेपाच हजार कोटी रुपये दिले आहेत. पूर, शेतकऱ्यांना अश्वसित केलं. त्याची तरतूद करायला वेळ जाईल. मुख्यमंत्री याबाबतचा केला आहे. असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

“कॅबिनेटमध्ये आम्ही सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत आहेत. विरोधी पक्ष आपल्या ध्येयात फूट पाडण्याचा प्रयत्नात आहे. ते खूप आटापिटा करत आहे. त्यांचा प्रत्येक प्रयत्न फसला पाहिजे,” असे बाळासाहेब थोरात यावेळी (Mahavikas aaghadi meeting) म्हणाले.

“आपल्यात आत्मविश्वास निर्माण करा,की आपल्याला काम करायचं आहे. आपण आपल्या सरकार बदललं सकारात्मक बोला. आम्ही प्रयत्न करू,तुम्ही सहकार्य करा,” असेही थोरातांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

“सगळ्यांनी समजून उमजून काम केलं तर यशस्वी होऊ. हे अधिवेशन नीट पार पडेल, पुढची वर्ष पण नीट असतील,” असेही थोरांतानी खडसावून सांगितले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें