मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानींकडे, मराठी तरुणांसाठी मनसेची बॅनरबाजी

अदानी कंपनीने यापुढे मराठी तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी द्यावी, अशी मागणी या बॅनरद्वारे करण्यात आलीय.

मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानींकडे, मराठी तरुणांसाठी मनसेची बॅनरबाजी
मनसेची बॅनरबाजी

मुंबई : बंगळुरु, लखनऊ आणि अहमदाबादनंतर आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाची धुराही आता उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) गेलीय. त्या पार्श्वभूमीवर आज विमानतळ परिसरात अदानी यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. अदानी कंपनीने यापुढे मराठी तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी द्यावी, अशी मागणी या बॅनरद्वारे करण्यात आलीय. इतकंच नाही तर मुंबई विमानतळावर मराठी भाषा आणि अस्मितेचा मान राखला गेला पाहिजे, असा इशाराही मनसेकडून देण्यात आलाय. (Management of International Airport in Mumbai to Gautam Adani’s company, MNS banner waving)

‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक भूमिपुत्रास रोजगार देण्यास आग्रही असावे. मुंबई विमातळाची धुरा सांभाळताना मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मान सन्मान राखलाच पाहीजे ही आपल्याकडून अपेक्षा आहे. तसंच आपणास जे सहकार्य लागेल त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर असेल’, असं बॅनर मनसेकडून लावण्यात आलं आहे. या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे, गौतम अदानी आणि मनसेचे महाराष्ट्र सरचिटणीस नयन कदम यांचा फोटो छापण्यात आला आहे.

अदानींकडे एकूण किती विमानतळे?

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं MIAL चे 10 रूपये मूल्याचे 28.20 कोटी शेअर खरेदी केले आहेत, अशी माहिती अदानी एन्टरप्रायझेसनं शेअर बाजाराला दिली. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड ही अदानी एन्टरप्राईझेसच्या मालकीची कंपनी आहे. GVK एअरपोर्ट डेव्हलपर्ससोबत व्यवहार पूर्ण झाल्यानंतर MIAL मध्ये अदानी समूहाचा हिस्सा 74 टक्के होईल. विमानतळाचा उर्वरित 26 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आहे. MIAL ची स्थापना 2 मार्च 2006 रोजी करण्यात आली होती. ही कंपनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या विकासाचं, निर्मितीचं आणि परिचालनाचं काम करते.

गौतम अदानींच्या कंपनीला केंद्र सरकारचं मोठ्ठं कंत्राट

गौतम अदानी यांच्या कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) रस्ता बांधणीचे मोठे कंत्राट मिळाले आहे. तेलंगणातील कोडाड ते खम्मम या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीचे काम आता अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेडकडून (ARTL) केले जाईल. या कंत्राटामुळे अदानी यांच्या कंपनीचा मोठा फायदा होणार असून त्यांनी आता संपत्तीच्याबाबतीत जेफ बेझोस यांची पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांनाही मागे टाकल्याचे समजते.

अदानी रोड ट्रान्सपोर्ट कंपनीकडून बुधवारी या कंत्राटासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार तेलंगणातील राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र सरकारकडून कंपनीला तब्बल 1039.90 कोटींचे कंत्राट मिळाले आहे. भारतमाला योजनेतंर्गत या महामार्गाचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पात चौपदरी मार्ग उभारला जाणार असून आगामी दोन वर्षांत या मार्गाची उभारणी होईल, असे अदानी रोड ट्रान्सपोर्ट कंपनीकडून सांगण्यात आले.

इतर बातम्या :

CBSE Board 12 Exam cancelled : बारावी परीक्षा रद्द; मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

अनिल परबांच्या अडचणी वाढणार?, दापोलीतील रिसॉर्टची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Management of International Airport in Mumbai to Gautam Adani’s company, MNS banner waving

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI