AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबांचा तळतळाट लागणार; जरांगेंचं कुटुंब संतापलं, सरकारला काय आवाहन केलं?

मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 18 दिवसांपासून उपोषण करत असलेल्या जरांगेंचं कुटुंबाचा संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्यांनी सरकारला मोठं आवाहन केलं आहे.

...तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबांचा तळतळाट लागणार; जरांगेंचं कुटुंब संतापलं, सरकारला काय आवाहन केलं?
Manoj JarangeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 15, 2026 | 3:05 PM
Share

मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव आहेत. मनोज जरांगे हे गेल्या 18 दिवसांपासून उपोषणावर आहेत. मरणार पण शरण जाणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मनोज जरांगे हे पाच दिवसांत मुंबईला पोहोचणार आहेत. परंतु 18 दिवसांच्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाने त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. त्यांना काही झालं तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबाचा तळतळाट लागेल, अशा शब्दात जरांगेंच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी म्हणाल्या, मनोज जरांगे यांना मुंबईला जाण्याची वेळ सरकारने आणली आहे. अन्यथा मुंबईला गेले नसते. त्यांनी दोन वेळा गुलाल उधळला. त्यांचा सरकारनेच अपमान केला. मुंबईला जाण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. पत्नी म्हणून कोणाला वाटतं की, आपला नवरा अन्नावाचून राहावा. माझा नवरा राहत आहे. कारण हे सरकारचं अपयश आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या असत्या, तर त्यांना मुंबईला जाण्याची वेळ आली नसती. एक महिना झाला, त्यांच्याशी बोलणं झालं नाही. सरकारने मुंबईला येण्याआधी तोडगा काढला पाहिजे. उपोषणस्थळी गेल्यापासून ते तिकडेच आहे. मागील 18 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे’.

जरांगेंच्या पत्नी संतापल्या

मनोज जरांगेंच्या जीवाला काही झालं ना, माझ्यासहित लेकरांसहित अख्ख्या मराठा कुटुंबाचा त्यांना तळतळाट लागणार. त्यांच्या तब्येतीची चिंता वाटत आहे. कारण 18-18 दिवस काय माणूस 18 तास देखील बिना अन्न पाण्याचं राहू शकत नाही. आज 18 दिवस झाले, त्यांच्या पोटात नाही. हे सरकारला दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांची मुलगी म्हणाली, ‘मुलगी म्हणून काळजी वाटत आहे. पण त्यांची मुंबईला जायची तिसरी वेळ आहे. 18 दिवसांचं उपोषण सुरू आहे. सरकारच्या अपयशामुळे मुंबईला जाण्याची वेळ आली आहे. विनंती करूनही सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्यांचा विचार करावं, असं आवाहन सरकारला करते. 14,13,12 मागण्या मान्य केल्या, असं म्हणण्यापेक्षा सगळ्या मागण्या मान्य कराव्या. खरंच मागण्या मान्य कराव्यात, कागदावर ठेवू नका. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करा. एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर समाजाचे असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालं नाही’.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?