रावसाहेब दानवेंकडून उद्धव ठाकरेंना ‘त्या’ वक्तव्याची आठवण, शेतकरी मदतीवरुन सरकारवर निशाणा

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर सध्या नुकसानग्रस्त भागातील पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. इतकंच नाही तर दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच एका वक्तव्याची आठवण करुन दिली आहे.

रावसाहेब दानवेंकडून उद्धव ठाकरेंना 'त्या' वक्तव्याची आठवण, शेतकरी मदतीवरुन सरकारवर निशाणा
रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री


परभणी : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ऊसासह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. आता शेतकरी सरकारकडे आस लावून बसला आहे. अशावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर सध्या नुकसानग्रस्त भागातील पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. इतकंच नाही तर दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच एका वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. (Raosaheb Danve criticizes CM Uddhav Thackeray over helping flood Affected farmers)

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं आणि शेतजमिनीचं मोठं नुकसान झालं आहे. या भागातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी रावसाहेब दानवे शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत. त्यावेळी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादेत असताना पंचनामे कशाचे करता, मदत जाहीर करा, अशी मागणी केली होती. आता नशिबाने उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी पंचनामे न करताना थेट शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

‘राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ नाही’

आज राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ नाही. आम्ही जसे फिरतोय, शेतकऱ्यांना भेटतोय, तसं अजूनही कुणी गेलेलं नाही. राज्यकर्ते दुसऱ्याच कामात व्यस्त आहेत, अशी घणाघाती टीका दावने यांनी केलीय. राज्यांनी केंद्राला मदत मागितली तर केंद्राचं पथक येतं. ते पथक नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत नुकसानाचा अंदाज घेऊन राज्य सराकरशी चर्चा करतात आणि परिस्थितीनुसार केंद्र मदत करत असते. पण आतापर्यंत केंद्राची मदत येण्यापूर्वी राज्य सरकार मदत करत असतं आणि केंद्राचे पैसे आल्यानं ते पैसा राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होत असतो. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या बजेटमधून मदत करावी. हा विषय राज्य सरकारचा आहे. मात्र, राज्य सरकारनं आपल्याकडे मदत मागितली तर आम्ही मदत करु, असं दानवे म्हणाले.

‘पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्यांना मदत करा’

ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

‘जनतेचा आवाज दाबता येत नसतो’, मुंबई, ठाण्यातील खड्ड्यांच्या राजकारणावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

West Bengal By-Poll : भवानीपूरमधून ममता बॅनर्जींचा विक्रमी मतांनी विजय, भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा पराभव

Raosaheb Danve criticizes CM Uddhav Thackeray over helping flood Affected farmers

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI