पराभवानंतर पाच दिवसांनी पहिली प्रतिक्रिया, पार्थ पवार म्हणतात….

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, अशी प्रतिक्रिया पार्थ यांनी ट्विटरवर दिली आहे. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पराभव केला. या पराभवानंतर तब्बल […]

पराभवानंतर पाच दिवसांनी पहिली प्रतिक्रिया, पार्थ पवार म्हणतात....
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 5:27 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही, तर सदैव मी लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, अशी प्रतिक्रिया पार्थ यांनी ट्विटरवर दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पराभव केला. या पराभवानंतर तब्बल पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये पार्थ यांनी मावळमधील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल व महाआघाडीतील सर्व सदस्यांनी निवडणुकीत केलेल्या कठोर परिश्रमासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो, असे लिहिलं आहे. त्याशिवाय फक्त एका निवडणुकीसाठी नाही तर मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन असेही आश्वासनही जनतेला दिले आहे.

Ajit Pawar Exclusive : ‘मावळमधील पराभवाची जबाबदारी अजित पवारची’

नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवारच्या पराभवावर भाष्य केलं. “मावळमध्ये झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे. जनतेने या निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. दुष्काळाची समस्या मोठी आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा याबाबत आम्ही चर्चा केली” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

पार्थची जागा जिंकून येणारी नव्हती : शरद पवार 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निकालाबाबत भाष्य केलं होतं. पार्थची जागा आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, जिंकून येणारी ती जागा नव्हती पण आम्ही प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती.

मावळचा निकाल

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. पार्थ पवार यांचा 2 लाख 15 हजार 913 मतांनी पराभव झाला.

संबंधित बातम्या 

बाळासाहेब विखेंच्या नातवावर गुलाल, पवार साहेबांच्या नातवाबद्दल बोलणार नाही : विखे      

पार्थ पवार यांचा तब्बल 215913 मतांनी पराभव, कुठे किती लीड?    

शिवसेनेचे मंत्रिपदाचे चारही दावेदार पराभूत! 

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.