एक गडबड अशीही! विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांऐवजी राहुल कनाल यांचा उल्लेख, महाराष्ट्र परिचय केंद्राचे ट्विट व्हायरल

शासनाची अधिकृत वेबसाईट असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ट्विटर हँडलवर ही चूक झाली होती. त्यांनी सुरुवातील विधानसभेचे अध्यक्ष म्हणून शिवसैनिक असलेल्या राहुल कनाल यांच्या नावाचा उल्लेख केला होता. मात्र त्यानंतर चूक दुरूस्त करत राहुल नार्वेकर असा बदल करण्यात आला.

एक गडबड अशीही! विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांऐवजी राहुल कनाल यांचा उल्लेख, महाराष्ट्र परिचय केंद्राचे ट्विट व्हायरल
Image Credit source: tv9 marathi
अजय देशपांडे

|

Jul 04, 2022 | 2:31 PM

मुंबई : आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारची बहुमत चाचणी पार पडली. ही बहुमत चाचणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सहज जिंकली. त्यांनतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिंदेंनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे जाहीर केले, मात्र यासर्वांमध्ये एक गडबड अशी झाली की, विधानसभा अध्यक्षांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्याची घोषणा केली, ही बातमी देताना शासनाचे अधिकृत ट्विटर हॅंडल असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राकडून चूक झाली. त्यांनी विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker)म्हणून चुकून राहुल नार्वेकर यांच्या नावाऐवजी राहुल कनाल यांच्या नावाचा उल्लेख केला. आपली चूक लक्षात येताच त्यांनी पुन्हा एकदा सुधारीत ट्विट केले, ज्यामध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून राहूल नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. मात्र तोपर्यंत हे ट्विट चांगलेच व्हायलर झाले.

नेमकं प्रकरण काय?

याबाबत अधिक माहिती अशी की शासनाची अधिकृत वेबसाईट असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ट्विटर हँडलवर ही चूक झाली होती. त्यांनी सुरुवातील विधानसभेचे अध्यक्ष म्हणून शिवसैनिक असलेल्या राहुल कनाल यांच्या नावाचा उल्लेख केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल कनाल यांनी जाहीर केले असा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केला होता. मात्र त्यानंतर चूक लक्षात येताच त्यांनी राहुल कनाल यांच्या नावाऐवजी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख करून आपली चूक दुरुस्त केली. मात्र तोपर्यंत हे ट्विट व्हायरल झाले होते.

हे सुद्धा वाचा

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस

दरम्यान आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सभागृहात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकोमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांसह बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें