AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादांनी मला सांगितलं, एक विक्षिप्त माणूस राज्याचा राज्यपाल म्हणून बसलाय : यशोमती ठाकूर

महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

दादांनी मला सांगितलं, एक विक्षिप्त माणूस राज्याचा राज्यपाल म्हणून बसलाय : यशोमती ठाकूर
| Updated on: Feb 04, 2021 | 6:18 PM
Share

सांगली : महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केलीय. सांगली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व्हावं अशी मागणी आहे. मात्र, राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे, असं विधान यशोमती ठाकूर यांनी केलं. यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारी सांगलीत कृषी महाविद्यालय होण्यासाठी अडथळा आणत आहेत, असाही आरोप केला. त्या आमदार विक्रम सावंत यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या (Minister Yashomati Thakur criticize Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari).

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “सांगलीत कृषी महाविद्यालय व्हावं अशी मागणी होती. दादांनी मला सांगितलं की तिथं गव्हर्नर म्हणून एक विक्षिप्त माणूस बसलेला आहे. मीडियावाल्यांना हे दाखवायचं असेल तर दाखवा. तुम्ही आम्ही संविधानाने एकत्र जोडलो आहोत म्हणून एकत्र आलोय. त्याच संविधानावर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारा व्यक्ती आज महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून बसलाय. ते अडथळे आणत आहेत म्हणून सांगलीत कृषी महाविद्यालय होत नाहीये.”

यावेळी यशोमती ठाकूर यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी वेगळा कार्यक्रम घेणार असल्याचंही सांगितलं. तसेच या कार्यक्रमाला पुरुषांना काही बोलवणार नसल्याचा टोलाही लगावला. “आमदार विक्रम सावंत यांना विकासाच्या कामात अगदी खांद्याला खांदा लावून मदत करु. मंत्रिमडळाची सदस्य म्हणूनच नाही तर त्यांची बहिण म्हणून त्यांना मदत करेल. जतला आम्ही दत्तक घेतलं असून या ठिकाणच्या विकासासाठी जे करता येईल ते करु. मंत्रिपद असू अथवा नसू,” असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना योजनांची यादी देत त्याचा उपयोग करण्याचंही आवाहन केलं.

हेही वाचा :

असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब; राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

जुन्या परंपरा मोडीत काढण्यात भाजपचा हातखंडा; राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून जयंत पाटलांचा टोला

व्हिडीओ पाहा :

Minister Yashomati Thakur criticize Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.